लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमधील हृदयद्रावक घटना

Pimpri-Chinchwad News: अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. मुलाची सुटका करण्यासाठी जवानांनी अथक प्रयत्न केले आणि अखेर त्याला लिफ्टमधून बाहेर काढले.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातील चोवीसवाडी परिसरातील राम स्मृती सोसायटीमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकून एका 12 वर्षांच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल 2 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात आणि सोसायटीत शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम स्मृती सोसायटीच्या बिल्डिंगमधील लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यादरम्यान अचानक बिघाड होऊन अडकली होती. लिफ्टमध्ये एक 12 वर्षांचा चिमुकला मुलगा अडकला असल्याची माहिती तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: बोटे छाटली, मनगट कापलं; दोन लहानग्यांसमोरच वडिलांची क्रूरपणे हत्या)

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. मुलाची सुटका करण्यासाठी जवानांनी अथक प्रयत्न केले आणि अखेर त्याला लिफ्टमधून बाहेर काढले. लिफ्टमध्ये अडकल्यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली होती.

मुलाला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला होता. ही बातमी मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण चोवीसवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Ulhasnagar Crime: 'मी इथला भाई..',गरब्यात केला गोळीबार,शिवसेना नेत्यावरही बंदूक ताणली..पण पोलिसांनी जे केलं..)

लिफ्टच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह

या दुर्घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लिफ्टमध्ये नेमका काय बिघाड झाला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली, याबद्दल स्थानिक पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. हा अपघात लिफ्टच्या सुरक्षिततेवर आणि सोसायटीतील देखभालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

Topics mentioned in this article