Pune News: पुणे शहरातील 'या' प्रमुख रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्यात लांबच लांब रांगा

पुणे शहरासह परिसरातील हजारो नागरिक सहकुटुंब खडकवासला चौपाटी आणि धरण परिसरात दाखल झाल्याने परिसरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Traffic News Today
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Traffic News Today : रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने खडकवासला धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली.विकेंडचा आनंद घेण्यासाठी पुणे शहरासह परिसरातील हजारो नागरिक सहकुटुंब खडकवासला चौपाटी आणि धरण परिसरात दाखल झाल्याने परिसरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पर्यटकांची संख्या अचानक वाढल्यामुळे सिंहगड रस्ता तसेच धरणाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.अनेक ठिकाणी वाहने संथ गतीने पुढे सरकत असल्याने वाहनचालकांना मोठा खोळंबा सहन करावा लागला.त्यामुळे परिसरात काही काळ वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

स्त्यांवर दिवसभर पर्यटकांची मोठी वर्दळ

सुट्टीचा दिवस आणि पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी खडकवासला परिसराला पसंती दिली. त्यामुळे धरण परिसर,चौपाटी आणि रस्त्यांवर दिवसभर पर्यटकांची मोठी वर्दळ होती.दरम्यान,वाढत्या वाहतुकीमुळे कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला.

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan-Dombivli News: पहिल्याच पावसात कल्याण-डोंबिवली शहराची दैना, 'या' भागातील नागरिकांचं झालंय मोठं नुकसान

"वाहतूक नियोजन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा"

त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. खडकवासला परिसरात पुढील काही आठवडेही पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक नियोजन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नक्की वाचा >> Dombivli News: 'त्या' दोन्ही धोकादायक इमारतीतील 50 रहिवाशांना इतरत्र हलवलं, रवींद्र चव्हाण लोकेशनवर गेले अन्..