जाहिरात

Kalyan-Dombivli News: पहिल्याच पावसात कल्याण-डोंबिवली शहराची दैना, 'या' भागातील नागरिकांचं झालंय मोठं नुकसान

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने यंदा केलेली नालेसफाई केवळ कागदावरच राहिली असल्याचं आज उघडकीस आलं आहे. पालिकेचा नालेसफाईचा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे.

Kalyan-Dombivli News: पहिल्याच पावसात कल्याण-डोंबिवली शहराची दैना,  'या' भागातील नागरिकांचं झालंय मोठं नुकसान
Water Logging In Kalyan Dombivli

KDMC Latest News Update : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने यंदा केलेली नालेसफाई केवळ कागदावरच राहिली असल्याचं आज उघडकीस आलं आहे. पालिकेचा नालेसफाईचा दावा पूर्णपणे फोल ठरला असून पहिल्याच जोरदार पावसात कल्याण-डोंबिवलीतील विविध भागांतील नाले तुंबले आहेत.त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचले असून अनेक सखल भागात आणि नागरिकांच्या घरातही पाणी शिरले आहे.पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिके विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. 

प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर नागरिकांची तीव्र नाराजी

दरम्यान,प्रशासनाची वाट न पाहता कल्याण पूर्व भागात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून नाल्यातील कचरा काढण्यास सुरुवात केली.गायकवाड यांनी स्वतः नाल्यात साचलेला प्लास्टिक आणि इतर कचरा बाहेर काढून नाल्याचा प्रवाह मोकळा केला.ज्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर आता नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नक्की वाचा >> Dombivli News: 'त्या' दोन्ही धोकादायक इमारतीतील 50 रहिवाशांना इतरत्र हलवलं, रवींद्र चव्हाण लोकेशनवर गेले अन्..

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात चार दिवसात एकूण 40 झाड कोसळल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेत रिक्षा दुचाकी आणि चार चाकी या वाहनांच्या समावेश आहे.कल्याण पूर्व येथील हनुमान नगर परिसरात पावसाळ्यामुळे महावितरणच्या वीज वाहिनी रस्त्यावर पडली होती.

नक्की वाचा >> Flood Video: उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी, दहिवली पुलावरून पाणी, कर्जतमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला

या घटनेत शशी चक्र नावाच्या एका महिलेच्या मृत्यू देखील झाला आहे. डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात कॅन्सर हॉस्पिटलच्या काम सुरू असताना दोन इमारतीचे संरक्षण भिंत कोसळल्याने या इमारतीतील 50 कुटुंबांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com