राहुल वाघ, प्रतिनिधी
Nashik Traffic Jam News : नाशिक शहरातील द्वारका सर्कल परिसरात गेल्या दोन तासांपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईहून धुळ्याकडे जाणारी प्रमुख वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून हजारो वाहनं रस्त्यावर अडकून पडली आहेत.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अंडरग्राउंड कामामुळे द्वारका सर्कलवरील वाहतूक मागील दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांची झाली कोंडी
मिळालेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बंदोबस्तामुळे आधीच वाहतुकीवर ताण होता. अशातच आज झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती आणखी गंभीर बनवली आहे.रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी नागरिकांची कोंडी झाली आहे.
नक्की वाचा >> Navi Mumbai : नवी मुंबईत सिडकोच्या माजी अधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई, राहत्या घरी ACB चं पथक पोहोचलं अन्..

तसच या वाहतूक कोंडीत आपत्कालीन सेवेच्या गाड्याही अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये,तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात 'या' भागातील पोलीस भरती दरम्यान भयंकर प्रकार, 9 उमेदवारांमुळे पोलिसांची झोपच उडाली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world