सध्या राज्यातील विविध भागात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं जात आहे. उल्हानगरनंतर आज पुण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मात्र सकल मराठा समाजातील काही तरुणांनी आमदार नितेश राणे यांना विरोध दर्शवला आहे. आमचा हिंदू जन आक्रोश मोर्चाला विरोध नाही, पण नितेश राणे हे मनोज जारंगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे आमचा नितेश राणेंना विरोध आहे. आमचे चार बांधवही पोलिसांनी ताब्यात घेतले असून आम्हाला देखील पोलीस केव्हाही अटक करू शकतात, असा आरोप या तरुणांनी केलाय. मात्र नितेश राणेंची सभा आम्ही उधळून लावणारच असल्याचं या तरुणांनी म्हटलयं.
सकल मराठा समाजाच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप सकल मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सकाळी सात वाजल्यापासून सकल मराठा सामाज्याचे चार कार्यकर्ते पोलीस ठाण्यातच. पोलिसांनी मिटिंगसाठी म्हणून चार तास त्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. काहीही झाले तरी राणेंचा निषेध करणारच असा सकल मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केल्याचं दिसतंय. अनुचित प्रकार रोखण्यासाठी इंदापूर शहरात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.
नक्की वाचा - 'आरक्षण कुठे काढलंय', संभाजी भिडेंची मराठा आरक्षणावर रोखठोक भूमिका
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्याच्या इंदापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. मात्र आमदार नितेश राणे यांना इंदापुरात येण्यास काही मराठा तरुणांसह राजकीय संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस सज्ज झाले असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंदापूर पोलिसांनी शेकडोंच्या संख्येत इंदापूर शहरातून रूट मार्च काढलाय. सध्या इंदापूर शहर आता शेकडोच्या संख्येत पोलिसांचा फौज फाटा तैनात आहे