संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील सद्यपरिस्थिवीर आपली भूमिका मांडली. यावेळी संभाजी भिडे यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं. मात्र केवळ आर्थिक मदत किंवा मानधन बरोबरच महिलेच्या केसाला धक्का लागणार नाही, असं शासन अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. याशिवाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही कठोर मतप्रदर्शन केलं.
मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये वाघ, सिंहाने प्रवेश मागावा का? स्वीमिंग क्लबमध्ये माशांनी जावं का? मराठ्यांनी आरक्षण मागावं का..असा सवाल उपस्थित केला. मराठ्यांनी अख्खा देश चालवायचाय. आरक्षण कुठे काढलंय असं म्हणत आपली भूमिका मांडली. मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे. हे मराठा समाजाच्या लक्षात येत नाही असंही ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा - जरांगे निवडणूक लढवण्याच्या तयारीत, आतापर्यंत 150 अर्ज; माजी आमदार-आमदारपुत्राचाही समावेश
बांगलादेशात झालेल्या राजकीय उलथापालथीवरही संभाजी भिडे यांनी भाष्य केलं. बांगलादेशातच्या पंतप्रधान शेख हसीना आश्रयासाछी भारतात आल्या. कारण हिंदुस्तानची संस्कृती परंपरा ही जगाच्या कल्याणासाठी असणारी वृत्ती आहे.
बांगलादेशात होणाऱ्या हिंदुच्या अत्याचारावर अपेक्षित निषेध भारतातून केला जात नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या घटनांचा निषेध म्हणून
सांगली 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळण्याचं ठरवलं आहे. पश्चिम बंगालमधील डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवर भिडेंनी संताप व्यक्त केल्या. आपल्या देशात बलात्काराच्या घटना वाढत आहेत. यावर कठोर भूमिका घ्यायला हवी, असं संभाजी भिडे यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world