
Maharashtra School Holiday: राज्याला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी ही मुंबई आणि इतर जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शाळा आणि कॉलेजला उद्या मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेने तसा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या 19 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवारी मुंबई महानगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा या उद्या बंद राहातील. शिवाय नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन ही करण्यात आले आहे. गरज असल्या शिवाय कुणी ही बाहेर येवू नये असं सांगण्यात आले आहे.
मुंबई प्रमाणे ठाणे, कल्याण, नवी मुंबई, आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना ही स्थानिक प्रशासनाने शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Maharashtra School Holiday) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन उद्याच्या स्थिती नुसार घेईल असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार या जिल्ह्यातमध्ये शाळा कॉलेज उद्या बंद राहातील. त्याच बरोबर रायगडमधील शाळा महाविद्यालये ही उद्या बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे परिपत्रक जारी केले आहे. उद्या रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाची खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. शिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळ आणि कॉलेजला ही उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या जिल्ह्यात सुट्टी जाहीर
- मुंबई
- मुंबई उपनगर
- नवी मुंबई
- ठाणे
- कल्याण
- पालघर
- रायगड
- रत्नागिरी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world