छ्त्रपती संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. 17 वर्षीय मुलीची 200 फूट डोंगवरून खाली ढकलून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच हे कृत्य केल्याचं तपासात उघड झालं आहे. आरोपीला ताब्यात घेतलं असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नम्रता शेरकर असं मृत मुलीचं नाव आहे. तर ऋषिकेश शेरकर (25 वर्ष) असं भावाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता अंबड तालुक्यातील शहागड येथील घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती.
(नक्की वाचा- HMPV Update : पुन्हा मास्क, पुन्हा सॅनिटायझर? भारतात HMPV चे 2 रुग्ण, आरोग्य विभागाने जारी केली नियमावली)
चिडलेल्या मुलीची समजूत काढण्यासाठी घरच्यांनी तिला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते. काकाचा मुलगा ऋषिकेश याने नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर नेले आणि तेथून ढकलून दिले. उंच डोंगरावरुन पडल्याने मुलीचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सर्वांना वाटलं. याप्रकरणी पोलिसांकडून सविस्तर तपास सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world