Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती पाणीसाठा?

Mumbai Water Storage News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 7 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.  मे, जून महिन्यात हा साठा अधिक कमी होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पाटील, मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे येत्या काळात मुबंईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. मुंबईल पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणी पातळी निम्म्यावर आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबईकरांना केलं जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या काही दिवसात उष्णता वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. याशिवाय पाणी गळतीमुळे देखील खूप पाणी वाया जाते. त्यामुळे मुंबईकरांना पुरवलं जाणारं पाणी येत्या काही दिवसात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा-  Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 7 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.  मे, जून महिन्यात हा साठा अधिक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे हा पाणीकपात रोखण्यासाठीचा सोपा उपाय असेल.  

(नक्की वाचा- 19 व्या विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा ठराव? 29 ठराव कोणते ते जाणून घ्या!)

धरणांमधील पाण्याची स्थिती काय

  • अप्पर वैतरणा - 1 लाख 63 हजार 299 दशलक्ष लिटर 
  • ⁠मोडक सागर- 26 हजार 316 दशलक्ष लिटर 
  • ⁠तानसा - 66 हजार 612 दशलक्ष लिटर 
  • ⁠मध्य वैतरणा- 98 हजार 803 दशलक्ष लिटर 
  • ⁠तुळशी - 4 हजार 535 दशलक्ष लिटर 
  • ⁠भातसा - 3 लाख 75 हजार 432 दशलक्ष लिटर 
  • ⁠विहार - 16 हजार 438 दशलक्ष लिटर

Topics mentioned in this article