VIDEO : आयफोनची क्रेझ! नवीन iPhone 16 च्या खरेदीसाठी लोकांच्या स्टोअरबाहेर रांगा

आयफोनची नवीन सीरिजच्या खरेदीसाठी लोकांमध्ये क्रेझ दिसत असते. यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या. येथे उपस्थित असलेल्या आयफोनप्रेमींना फोन घेण्याची घाई झाली असून लोक दुकान उघडण्याची वाट पाहत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

आयफोन प्रेमींची संख्या जगभरात मोठी आहे. आयफोन प्रेमी सप्टेंबर महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण आयफोनचे नवे मोबाईल आणि इतर वस्तू याच महिन्यात लॉन्च होतात. यावर्षीही iPhone 16 सीरिज आयफोनने लॉन्च केली आहे. भारतात 20 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून iPhone 16 सीरिजची विक्री सुरू झाली आहे. नवीन iPhone घेण्यासाठी लोकांनी अॅपल स्टोअर बाहेर अक्षरश: रांगा लावल्या आहेत. मुंबईतील BKC Apple Store च्या बाहेर मोठी गर्दी जमली. 

आयफोनची नवीन सीरिजच्या खरेदीसाठी लोकांमध्ये क्रेझ दिसत असते. यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या. येथे उपस्थित असलेल्या आयफोनप्रेमींना फोन घेण्याची घाई झाली असून लोक दुकान उघडण्याची वाट पाहत आहेत. गर्दी लक्षात घेऊन याठिकाणी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

(नक्की वाचा - iPhone 16 ची प्रतीक्षा अखेर संपली, भारतात नव्या आयफोनची किंमत किती?)

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात केल्यामुळे आयफोन प्रथमच आयफोन प्रो सीरिजची मागील सीरिजपेक्षा कमी किमतीत विक्री करत आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, "iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे आणि iPhone 16 Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,44,900 रुपये आहे."

सुमारे एक वर्षापूर्वी, iPhone 15 Pro 1,34,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आणि iPhone 15 Pro Max ची सुरुवातीची किंमत Rs 1,59,900 लाँच करण्यात आली होती. iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max 128 GB, 256 GB, 512 GB आणि 1 TB स्टोरेज क्षमतेमध्ये उपलब्ध असतील. तसेच आयफोन मालिकेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले आकार 6.3 इंच आणि 6.9 इंच असेल.

(नक्की वाचा - iPhone 16 सीरिजची प्री-बुकिंग  सुरू, कंपनीकडून जबरदस्त discount offer)

मात्र भारतात असेंबल केलेल्या iPhone 16 आणि iPhone 16 Plus च्या किमतीत कोणताही फरक नाही. Apple ने सांगितले होते की, “iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे आणि iPhone 16 Plus ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आहे.”

Topics mentioned in this article