जाहिरात

iPhone 16 सीरिजची प्री-बुकिंग आजपासून सुरू, कंपनीकडून जबरदस्त discount offer

iPhone 16 series pre order : 20 सप्टेंबरपासून हा मोबाइल विकत घेता येणार आहे, मात्र आजपासून ग्राहक प्री-ऑर्डर करू शकतात. काय आहे प्री-ऑर्डरची योग्य पद्धत, जाणून घेऊया..

iPhone 16 सीरिजची प्री-बुकिंग आजपासून सुरू, कंपनीकडून जबरदस्त discount offer
मुंबई:

अॅपलने काही दिवसांपासून लेटेस्ट iPhone 16 सीरिज लॉन्च केली आहे. यामध्ये iPhone 16, iPhone 16 प्लस, iPhone 16 प्रो आणि iPhone 16 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. नव्या सीरिजमध्ये हॉर्डवेअर आणि कॅमेऱ्यातील बदल करण्यात आला आहे. याशिवाय ही सीरिज अॅपल इंटेलिजन्ससह मार्केटमध्ये दाखल झाली आहे. 20 सप्टेंबरपासून हा मोबाइल विकत घेता येणार आहे, मात्र आजपासून ग्राहक प्री-ऑर्डर करू शकतात. काय आहे प्री-ऑर्डरची योग्य पद्धत, जाणून घेऊया..

लॉन्च कार्यक्रमादरम्यान 9 सप्टेंबर रोजी अॅपलने यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार, लेटेस्ट मॉडेलसाठी 13 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर करता येणार आहे. याच्या एक आठवड्यानंतर 20 सप्टेंबरपासून ही सीरिज मार्केटमध्ये उपलब्ध होईल. जर तुम्हाला सर्वात आधी ही नवी सीरिज खरेदी करायची इच्छा असेल तर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त Flipkart, Amazon या रिटेल चॅनल्सवरही आयफोन बुक करू शकता. 

iPhone 16 प्री-ऑर्डरची योग्य पद्धत...
iPhone 16 सीरिजच्या प्री-ऑर्डर आज 13 सप्टेंबरपासून सायंकाळी 5.30 वाजेपासून सुरू होईल. नव्या सीरिजची खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ किंवा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर जावं लागेल आणि योग्य व्हेरियंटची (iPhone Discount)  निवड करा. आपल्या आवडत्या iPhone 16 मॉडेलचा स्टोरेड व्हेरियंट आणि रंग निवडीनंतर शेवटी तुम्हाला प्री-ऑर्डरचा पर्याय दिसेल. टोकन अमाऊंट दिल्यानंतर तुम्ही सहज बुक करू शकता. 

iPhone 16 ची प्रतीक्षा अखेर संपली, भारतात नव्या आयफोनची किंमत किती, Sale कधीपासून होणार सुरू?

नक्की वाचा - iPhone 16 ची प्रतीक्षा अखेर संपली, भारतात नव्या आयफोनची किंमत किती, Sale कधीपासून होणार सुरू?

खास बँक आणि एक्सजेंच ऑफर...

ज्या ग्राहकांनी प्री-ऑर्डर केलेत त्यांनाच सर्वात आधी आयफोन दिला जाईल. याशिवाय ग्राहकांना American Express, Axix Bank, ICICI bank या बँकांच्या कार्डाच्या मदतीने पाच हजार रुपयांची सवलत आणि कॅशबॅकही मिळू शकतं. सोबतच जुना फोन अपग्रेड केल्यावर 67,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. 


 

Previous Article
Gauri ganpati 2024 : आई की बहीण, गौरी-गणपतीमध्ये नेमकं नातं काय?
iPhone 16 सीरिजची प्री-बुकिंग आजपासून सुरू, कंपनीकडून जबरदस्त discount offer
cpi-m-sitaram-yechury-body-donated-to-aiims-know-body-donation-guidelines-in-india
Next Article
सीताराम येचुरींनी पार्थिव केले हॉस्पिटलला दान, वाचा काय आहेत बॉडी डोनेशनचे नियम