IMD Mumbai Rain Alert: पुढच्या 24तासात 'अतिजोरदार' पाऊस पडणार, वेधशाळेचा अलर्ट

Mumbai Rain Update: 28 ते 29 सप्टेंबर या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या काळामध्ये सर्वाधिक पाऊस पश्चिम उपनगरात झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतचा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील पावसाळी स्थितीचा अहवाल (Monsoon Report) जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मुंबई शहर व उपनगरात 28 सप्टेंबरपर्यंत म्हणजे कालपर्यंत सरासरीच्या 115.44% पाऊस झाला आहे.  मुंबई शहराच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस मुंबई उपनगरांत झाला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरे मिळून सरासरीच्या 116 टक्के पाऊस झाला आहे तर मुंबई शहरात सरासरीच्या 106 टक्के पाऊस झाला आहे. 

नक्की वाचा: मुंबई, पुणे, ठाणे अतिमुसळधार पावसाचा इशारा; आज कोणत्या जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर

दहिसरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद

28 ते 29 सप्टेंबर या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या काळामध्ये सर्वाधिक पाऊस पश्चिम उपनगरात झाला आहे. पश्चिम उपनगरात सरासरी 99.44 मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस दहिसर येथील तरे मनपा शाळा (142 मिमी)  येथे नोंदवण्यात आला आहे. बोरीवली येथे 141 मिमी आणि दिंडोशी येथे 140 मिमी इतका पाऊस नोंदवण्यात आला आहे. कुलाबा येथे 101.2 मिमी, तर सांताक्रुझ येथे 77.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईतील तलावांमध्ये पाणीसाठा किती आहे?

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण सात तलावांमध्ये सध्या 1412132 दशलक्ष लिटर (ML) उपयुक्त पाणीसाठा आहे. मात्र, गेल्या वर्षी 28 सप्टेंबर 2024 रोजी हा साठा 1434227 दशलक्ष लिटर होता. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत 22095 दशलक्ष लिटर पाण्याचा साठा कमी आहे. मोडकसागर (163.17 मीटर) आणि तानसा (128.52 मीटर) पूर्ण क्षमतेने भरले आहेत, परंतु मध्य वैतरणा (-0.76 मीटर) आणि भातसा (-0.72 मीटर) हे अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाही.  

नक्की वाचा: मुंबईतील नवीन लँडमार्क; पाहा सीएसएमटी मेट्रो स्टेशनचा फर्स्ट लूक

आज ऑरेंज, उद्या यलो अलर्ट; मुंबईत पावसाची विश्रांती

हवामान खात्याने 29 सप्टेंबर म्हणजेच सोमवारसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. 30 तारखेसाठी म्हणजेच मंगळवारसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र प्रत्यक्षात सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article