IT notice to Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांना Income Tax ची नोटीस; शिरसाटांचा एकूण संपत्ती किती?

आयकर विभागाच्या नोटीसला कायदेशीररित्या उत्तर देऊ, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. आयकर विभाग अशा नोटीसा पाठवत असतं. 9 जुलै रोजी मला नोटीसला उत्तर देण्यास सांगितलं होतं, मात्र मी वेळ वाढवून मागितला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

IT notice to Sanjay Shirsat : राज्याचे सामजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे.  2019 मधील संपत्ती 2024 मध्ये एवढी कशी वाढली अशी विचारणा आयकर विभागाकडून करण्यात आल्याची माहिती आहे. स्वतः संजय शिरसाट यांची आयकर विभागाची नोटीस मिळाल्याची कबुली दिली आहे.  

आयकर विभागाच्या नोटीसला कायदेशीररित्या उत्तर देऊ, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. आयकर विभाग अशा नोटीसा पाठवत असतं. 9 जुलै रोजी मला नोटीसला उत्तर देण्यास सांगितलं होतं, मात्र मी वेळ वाढवून मागितला आहे. कोणतीही चौकशी झाली तरी त्याला आम्ही उत्तर देऊ. कोणतंही राजकारण यामागे असण्याचं काहीही कारण नाही, असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं.  

(नक्की वाचा- Anil Parab Vs Shambhuraj Desai: "बाहेर ये तुला दाखवतो...", शंभुराज देसाईची सभागृहात अनिल परबांना धमकी)

संजय शिरसाट यांची संपती किती?

विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार संजय शिरसाट यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत पाच वर्षात दहापट वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पाच वर्षांच्या कालावधीत शिरसाट यांची संपत्ती ३ कोटी ३१ लाखावरून तब्बल ३३ कोटी ३ लाखांवर गेली आहे. सध्याच्या घडीला शिरसाट यांच्याकडे ४४ लाख ७८ हजार रोकड आहे. तर विविध बँकांचे त्यांच्याकडे २६ कोटी ४५ लाख ७५ हजार ९२२ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे.

शिरसाटांकडे ४ कोटी ३७ लाख ६० हजार ७६१ रुपये किमतीची शेतजमीन, ४ कोटी ७० लाख ४५ हजार ८६० रुपयांचे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फ्लॅट आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे ६३ लाख ९८ हजार रुपये किमतीची जमीन आणि ५ कोटी ६५ लाख ५५ हजार ९८० रुपये किमतीचे फ्लॅट आहेत. पत्नीच्या स्थावर मालमत्तेची किंमत १९ कोटी ६५ लाख ३२ हजार १५ रुपये इतकी आहे.

Advertisement

(नक्की वाचा- Maharashtra Politics News:कोणत्याही तडजोडीला तयार! नव्या भिडूचा महाविकास आघाडीला प्रस्ताव)

संजय शिरसाट यांच्याकडे पत्नीच्या नावे १८ लाख ५०० रुपये किमतीची कार आहे. तसेच सोन्याचे दागिने आणि एलआयसी, विविध बँकांतील ठेवी अशी एकूण १३ कोटी ३७ लाख ८८ हजार ४७२ रुपयांची गुंतवणूक आहे.

Topics mentioned in this article