जाहिरात

Monsoon Update: राज्यात पाऊस कधी येणार? 'या' तारखेपासून मान्सून पुन्हा सक्रीय होण्याचा IMD चा अंदाज

Rain Update: सध्या मान्सूनची सीमा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, रांची आणि मुझफ्फरपूर या भागांवर स्थिर आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती हळूहळू अनुकूल होत आहे.

Monsoon Update: राज्यात पाऊस कधी येणार? 'या' तारखेपासून मान्सून पुन्हा सक्रीय होण्याचा IMD चा अंदाज

यंदा देशात मान्सूनचे आगमन वेळेत झाले असले, तरी त्याची पुढील वाटचाल पूर्णपणे थंडावली आहे. नैऋत्य मान्सून अडकून पडल्यामुळे 4 ते 18 जून या कालावधीत संपूर्ण देशभरात सरासरीच्या तुलनेत 41 टक्के पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे, अशी चिंताजनक माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. या काळात देशात 72.2 मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ 42.6 मिमी पाऊस झाला आहे.

मान्सूनची सद्यस्थिती काय?

मान्सून 8 जून रोजी दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात वेळेत दाखल झाला होता. साधारण 10 ते 15 जून दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होणे अपेक्षित होते, परंतु 17-18 जून उजाडला तरी मान्सून पुढे सरकलेला नाही. सध्या मान्सूनची सीमा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, रांची आणि मुझफ्फरपूर या भागांवर स्थिर आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती हळूहळू अनुकूल होत आहे.

(नक्की वाचा-  VIDEO: "कदाचित हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल, माझं बरं वाईट झालं तर...", प्रसाद वेदपाठकची मदतीसाठी हाक)

24 जूननंतर जोर वाढणार

न्युमेरिकल वेदर मॉ़डेल संकेतांनुसार, 22 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात केवळ तुरळक पाऊस पडेल. या काळात कुठेही अतिवृष्टी किंवा सर्वदूर मुसळधार पाऊस होणार नाही. खऱ्या अर्थाने 24 आणि 25 जूनच्या सुमारास कोकण पट्टी आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः 25 ते 28 जूनच्या दरम्यान पश्चिम किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होत आहेत. 26 आणि 27 जूनच्या सुमारास हा पावसाचा जोर उत्तर कोकणात पोहोचेल.

(नक्की वाचा-  Shiv Sena UBT Crisis: उद्धव-आदित्य ठाकरे गप्प, संजय राऊतांची बॅटिंग; ठाकरे गटात नेमकं काय सुरुये?)

मुंबईत मान्सूनचा नवा विक्रम?

यंदा मुंबईकरांना मान्सूनसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. रेंगाळलेल्या प्रवासा मुळे मुंबईत यंदा मान्सूनच्या विलंबाने आगमनाचा एक नवा विक्रम नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com