Ministry of Road Transport and Highways: देशभरात हायवे टोल सिस्टम पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून सरकार मल्टी-लेन फ्री फ्लो (Multi-Lane Free Flow) म्हणजेच MLFF सिस्टम लागू करत आहे. ज्यामध्ये गाड्यांच्या टोल प्लाझावर थांबवण्याची आवश्यकता लागणार नाही. आता या नवीन व्यवस्थेच्या माध्यमातून सरकार Toll-Free वाहनांसाठी वेगळ्या प्रकारचे FASTag बनवण्याचा प्लॅन करत आहे.
रिपोर्ट्नुसार, हे खास FASTag त्या वाहनांसाठी असणार आहे, ज्यांना टोल टॅक्सची सूट मिळालेली आहे. जसे की आर्मी,पोलीस,काही सरकारी एजन्सीच्या गाड्या..सरकारचा उद्देश हे निश्चित करणं आहे की,अशी वाहने कोणत्याही प्रकारचा थांब्याशिवाय आणि चुकीच्या दंडाशिवाय सहजपणे हायवेवरून प्रवास करू शकतील.
काय आहे नवीन MLFF टोल सिस्टम?
सरकार ज्या MLFF म्हणजे Multi-Lane Free Flow सिस्टमला लागू करत आहे,त्यामध्ये AI,सॅटेलाईट ट्रॅकिंग आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (Automatic Number Plate Recognition) म्हणजेच ANPR तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.या सिस्टममध्ये वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज पडणार नाही.
नक्की वाचा >> Ulhasnagar News: एका रिक्षाने अख्ख्या उल्हासनगरात उडवली खळबळ, पोलिसांची धडक कारवाई, उडीसाचं कनेक्शन आलं समोर
जसं एखादं वाहन हायवेच्या टोल झोनवरून जाईल,सिस्टम त्याची नंबर प्लेट आणि FASTag ला स्कॅन करून आपोआप टोल कट करेल.यामुळे ट्रॅफिक जॅम कमी होईल.इंधनाची बचत होईल आणि प्रवासाची वेळही वाचेल.सरकारला वाटतंय की,ही पद्धत भारताच्या हायवे सिस्टमला जास्त आधुनिक आणि वेगवान बनवेल.
सुरक्षेचा विचार करूनच सिस्टम बनवणार
रिपोर्टमध्ये म्हटलंय की, सरकार राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करूनच डिफेन्स वाहनांचा डेटा लगेच डिलिट करण्याची योजना आखत आहे.म्हणजेच कोणतंही आर्मी वाहन टोलवरून गेल्यास,सिस्टम त्या वाहनांना ओळखून त्या वाहनांची हालचाल आणि माहिती सेव्ह करणार नाही. सरकार या समस्येवर उपाय काढण्यासाठी दोन वेगवेगळ्या विकल्पांचा विचार करत आहे. पहिली पद्धत ही आहे की,टोल फ्री वाहनांची माहिती आधीच रस्ते परिवहन मंत्रालयाच्या डेटाबेसमध्ये जोडली जाईल. म्हणजे AI सिस्टम त्यांना लगेच ओळखेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world