- पुरंदर तालुक्यातील बेलसर टोलनाक्यावर दुचाकीस्वारांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली आहे
- ही घटना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे
- शंभर पेक्षा जास्त बुलेटस्वारांनी हातात कोयते घेवून नाचवले
देवा राखुंडे
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथल्या बेलसर टोलनाक्यावर काही दुचाकीस्वारांनी हातात कोयते घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. काल मध्य रात्री दोन वाजताच्या सुमारासचा हा प्रकार घडला आहे. टोल नाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. बुलेटचे फटाके काढत हातात कोयचे नाचवत जवळपास शंभरहून अधिक दुचाकी स्वारांनी या परिसरात दहशत माजवली आहे. त्यानंतर इथं भीतीचे वातावरण आहे. हे कृत्य बुलेट गँगने केल्याचे बोलले जात आहे. यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी आता केली जात आहे.
दिवेघाटात ज्या बुलेट गँगने हातात कोयते नाचवले होते, त्याच बुलेट गँगचे हे कृत्य असावे असा अंदाज लावला जात आहे. या संपूर्ण प्रकारांमुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. पोलिसांनी अशा टोळक्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे. या गँगमध्ये शेकडो बुलेट आहेत. ते या परिसरात रात्रीच्या वेळी आपली दहशत निर्माण करत आहे. त्यातून आपला धाक दाखवण्याचा त्यांना प्रयत्न आहे. त्यासाठी ते कोयत्यांचाही वापर करताना दिसले आहेत. दिवेघाटात ही असात धिंगाणा या गँगने घातला होता.
दरम्यान शेकडोच्या संकेत बुलेट गँगने काल रात्री पुण्यातील दिवे घाटात बुलेटच्या सायलेन्सरच्या माध्यमातून फटाके फोडत दहशत माजवली होती. यावेळी काही बुलेट स्वरांनी हातात कोयते नाचवले होते. इंदापूर तालुक्यातील सणसर येथील एका प्रवाशाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता. हा व्हिडिओ समाज माध्यमाचा प्रसारित झाल्यानंतर समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दिवेघाटातील तो व्हिडिओ आणि बेलसर टोल नाक्यावरील व्हिडिओ पाहता ही दोन्ही गँग एकच असल्याचं प्रथम दर्शनी तरी दिसून येत आहे. दोन्ही ठिकाणचे हे व्हिडिओ पाहता पुणे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोट ठेवले जात आहे.
पुणे आणि परिसरात सध्या अनेक गुन्हे होत आहेत. कधी कोयता गँग तर कधी टोळी युद्ध यामुळे पुणे नेहमीच चर्चेत आहे. काही वेळा कौटुंबिक हिंसाचाराने ही पुण्याचं नाव बदनाम झालं आहे. शहरातच नाही तर जिल्ह्यात ही अशाच काही घटना घडत आहेत. त्यात आता ही नवी बुलेट गँग समोर आली आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीसांची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे. त्यामुळे या गँगचा शोध घेवून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पुणे ग्रामीण पोलीसांसमोर आहे. त्यांना मिळालेल्या व्हिडीओच्या आधारे ते आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world