जाहिरात

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर, रेल्वेमार्ग झाले फायनल, महाराष्ट्रात कोणते स्टेशन?

भारतीय रेल्वेने देशाच्या बुलेट ट्रेनची डिझाईन समोर आणली आहे.ही ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणार आहे.रेल्वे मंत्रालयाने राजधानी दिल्लीत या ट्रेनचा एक फोटो प्रदर्शित केला आहे.

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर, रेल्वेमार्ग झाले फायनल, महाराष्ट्रात कोणते स्टेशन?
Mumbai Ahmedabad Bullet Train First Design
मुंबई:

Mumbai-Ahmedabad Bullet Train: भारतीय रेल्वेने देशाच्या बुलेट ट्रेनची डिझाईन समोर आणली आहे.ही ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणार आहे.रेल्वे मंत्रालयाने राजधानी दिल्लीत या ट्रेनचा एक फोटो प्रदर्शित केला आहे.एनआयच्या रिपोर्टनुसार,देशाची पहिली प्रस्तावित बुलेट ट्रेनचा एक फोटो रेल्वे मंत्रालयाकडून प्रदर्शित करण्यात आला आहे.हा फोटो गेट नंबर 4 वर लावण्यात आला आहे.

देशाची पहिली बुलेट ट्रेन

भारतीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये लोकसभेत म्हटलं की, 508 किमी लांब मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रोजेक्ट महाराष्ट्र,गुजरात आणि केंद्र शासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीतून जाणार आहे. वैष्णव म्हणाले होते की,मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या या रुटवर 12 स्टेशन असतील.मुंबई,ठाणे,विरार,बोईसर,वापी,बिलीमोरा,सूरत,भरूच,वडोदरा,आनंद, अहमदाबाद आणि साबरमती..

नक्की वाचा >> Palghar News : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मुंबई-अहमदाबाद हायवेवर 12 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी

किती झालंय बुलेट ट्रेनचं काम?

भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार,MAHSR प्रोजेक्टसाठी, गुजरातचे आठ स्टेशन (वापी,बिलिमोरा,सूरत, भरूच,आनंद,वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती) पर्यंत पायाभरणी झाली आहे. महाराष्ट्रात ठाणे, विरार आणि बोईसरमध्ये काम सुरु आहे.तर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) स्टेशनवरील खोदकाम जवळपास पूर्ण झालं आहे. 

नक्की वाचा >> Cannes महोत्सवात 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीचीच चर्चा, पंढरपूरच्या चित्रकाराचं सातासमुद्रापार कौतुक

बुलेट ट्रेनसाठी सतरा नदी पुलांचं बांधकाम पूर्ण झालं आहे.तर गुजरातमध्ये चार मोठे पूल नर्मदा,माही,ताप्ती आणि साबरमती येथील कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.महाराष्ट्रातही चार नदी पुलांचं बांधकाम सुरू आहे.बुलेट ट्रेनचा हा प्रोजेक्ट मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशातील हाय स्पीड रेल्वेच्या क्षमतेला वाढवणार. यामाध्यमातून चेन्नईची इंटीग्रल कोच फॅक्ट्री (ICF) आणि बंगळुरुची BEML लिमिटेड यांच्याद्वारे 280 किलोमीटर प्रतितास वेग असणाऱ्या ट्रेन निर्माण केल्या जात आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com