जाहिरात

Cannes महोत्सवात 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीचीच चर्चा, पंढरपूरच्या चित्रकाराचं सातासमुद्रापार कौतुक

कान्स महोत्सवात मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. परंतु,निवेदिता सराफ यांची साडी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Cannes महोत्सवात 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीचीच चर्चा, पंढरपूरच्या चित्रकाराचं सातासमुद्रापार कौतुक
Nivedita Saraf Saree Photo, Cannes Festival

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Nivedita Saraf Saree Photo Viral : मराठमोळी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि त्यांचे पती पद्मश्री अशोक सराफ यांनी फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवात नुकतीच उपस्थिती दर्शवली.कान्स महोत्सवात मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. परंतु,निवेदिता सराफ यांची साडी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण या साडीवर मराठी नावाची पाटी घेतलेल्या मुलींचे चित्र पाहायला मिळाले. निवेदिता यांनी ही आकर्षक आणि सुंदर साडी नेसून कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर ग्रँड एंट्री घेतली.यावेळी निवेदिता सराफ यांच्या साडीवर असणारे पोलके व  नऊवारीवर मराठी पाटी घेतलेल्या मुलींचे चित्र झळकले होते. पंढरपुरातील चित्रकार सौरभ डिंगरे यांनी हे जबरदस्त चित्र रेखाटलेले आहे. 

साडीची आणि फॅशन स्टाईलची इंटरनेटवर तुफान चर्चा

निवेदिता अशोक सराफ यांनी कान्स चित्रपट महोत्सवासाठी नेसलेल्या साडीची आणि संपूर्ण फॅशन स्टाईलची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. निवेदिता यांच्या साडीवर नऊवारी व नाकात नथ घातलेल्या मुलींच्या हातात असणाऱ्या मराठी नावाच्या पाठीचे चित्र या महोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी पाट्यांचा डंकाच वाजल्याचं म्हटलं जात आहे. 

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा >> Palghar News : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मुंबई-अहमदाबाद हायवेवर 12 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी

फ्रान्समधील कान्स महोत्सवातही चर्चांना उधाण

सौरभ डिंगरे हे मदालसा बाय सौरभ या नावाने आपली चित्रे प्रसिद्ध करत असतात.सौरभ डिंगरे यांनी रेखाटलेल्या चित्रांचे आजवर पुणे ,मुंबई ,बेंगलोर ,गोवा आणि कलकत्ता अशा अनेक ठिकाणी प्रदर्शन भरवले गेले.स्वतःच्या आगळ्यावेगळ्या व भारतीय संस्कृतीच्या परंपरेची जपणूक करत स्वतःची अशी वेगळी स्टाईल सौरभ डिंगरे यांनी आपल्या चित्रात निर्माण केली आहे.मराठी अस्मिता व मराठी संस्कृतीचे प्रतीक असणारे चित्र त्यांनी निवेदिता सराफ यांच्या डिझायनर साडीसाठी दिले होते.हेच चित्र फ्रान्समधील कान्स महोत्सवात चर्चेचा विषय बनलं आहे. 

नक्की वाचा >> Trending News: वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही, FASTag नंतर आता 'ही' नवी टोल सिस्टम होणार लागू

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com