जाहिरात

Palghar News : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मुंबई-अहमदाबाद हायवेवर 12 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी

आयशर ट्रक आणि कंटेनर जागेवरच पलटी झाला. या अपघातात जवळपास 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 ते 25 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

Palghar News : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मुंबई-अहमदाबाद हायवेवर 12 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी
Mumbai- Ahmedabad Highway Accident News

Mumbai- Ahmedabad Highway Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धनिवारी अत्यंत दुर्देवी घटना घडली. साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात झाला. आयशर टेम्पो आणि कंटेनर यांच्या जोरदार धडक झाली. ट्रकमध्ये शंभरपेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती आहे. आयशर ट्रक आणि कंटेनर जागेवरच पलटी झाला. या अपघातात जवळपास 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 ते 25 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात केल दाखल.

मिळालेल्या माहितीनुसार, बापूगाव खडकीपाडा येथील बाळाराम जयराम दांडेकर यांच्या साखरपुड्यासाठी हे वऱ्हाड धनिवारीकडे निघाले होते. आयशर टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच 50 पेक्षा जास्त वराडी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भरधाव वेग, अरुंद जागा आणि चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की काही प्रवासी वाहनाखाली अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले.

नक्की वाचा >> Trending News: वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही, FASTag नंतर आता 'ही' नवी टोल सिस्टम होणार लागू

अपघातातील सर्व जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे साखरपुड्याच्या घरात आनंदाऐवजी शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात आणि प्रवासी वाहनांमध्ये होणारी अतिगर्दी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

नक्की वाचा >> Ulhasnagar News: एका रिक्षाने अख्ख्या उल्हासनगरात उडवली खळबळ, पोलिसांची धडक कारवाई, उडीसाचं कनेक्शन आलं समोर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com