जाहिरात

US-Iran War: युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले, इराणचाही गंभीर इशारा

US- Iran War: मिडिल ईस्टमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला असून, होर्मुज जलडमरूमध्ये ३ व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने इराणवर भीषण हवाई हल्ले केले आहेत.

US-Iran War: युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले, इराणचाही गंभीर इशारा

गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या मिडिल ईस्ट पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची भीती आहे. ,स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील 3 कमर्शियल जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकन सैन्याने थेट इराणच्या हद्दीत घुसून मोठे हवाई हल्ले केले आहेत. इराणच्या सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, होर्मुज तटाजवळील इराणी भूप्रदेशात अनेक शक्तिशाली स्फोट झाले आहेत. यात प्रामुख्याने केशम बेटावर 6, सिरिक शहरात 7 आणि इराणचे प्रमुख बंदरगाह शहर बंदर अब्बास येथे अनेक मोठे धमाके झाले आहेत.

अमेरिकेच्या या नव्या लष्करी कारवाईमुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असून, युद्ध कायमचे संपवण्यासाठी आणि शांतता करार करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेचा युक्तिवाद आणि इराणची गंभीर चेतावणी

'यूएस सेंट्रल कमांड'ने या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. अमेरिकन लष्कराने स्पष्ट केले आहे की, "हे जोरदार हल्ले आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारी मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आले आहेत. व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्यांना आणि त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल."

(नक्की वाचा- Nitin Gadkari: ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG, आता कचऱ्यावर धावणार बस! इथेनॉलनंतर नितीन गडकरींची मोठी घोषणा)

दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेवर दोन्ही देशांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. इराणने म्हटले आहे की, "अमेरिका या कराराचे उल्लंघन करून जे परिणाम घडवून आणत आहे, त्याबाबत आम्ही त्यांना गंभीर इशारा देत आहोत. इराण आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि हिताच्या रक्षणासाठी अत्यंत कठोर पावले उचलण्यास सक्षम आहे."

अयातुल्लाहंच्या अंत्यसंस्कारावेळीच हल्ला

या हल्ल्यांचे टायमिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त ठरले आहे. इराणमध्ये सध्या त्यांचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराचे विधी सुरू आहेत. ज्यांचा मृत्यू युद्धाच्या सुरुवातीलाच झाला होता. लाखो इराणी नागरिक आपल्या नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले असतानाच अमेरिकेने हे बॉम्बस्फोट केले आहेत.

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः तुर्कीमध्ये आयोजित नाटो (NATO) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. 'सीएनएन'च्या रिपोर्टनुसार, तज्ज्ञांचे असे मत आहे की, ट्रम्प नाटो परिषदेदरम्यान इराणवर हल्ला करून स्वतःच्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन करू इच्छितात.

(नक्की वाचा-  Dombivli News: शिंदे गटाच्या नगरसेवकाची गुंडगिरी; महिला डॉक्टर आणि नर्सना रुग्णालयात घुसून मारहाण)

नाटो देशांची नाराजी आणि ट्रम्प यांना राजकीय धोका

अमेरिकेच्या या मनमानी हल्ल्यामुळे तुर्कीमध्ये जमलेल्या पाश्चात्य देशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ट्रम्प आधीपासूनच नाटो देशांवर घसरले होते, कारण हे देश इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत अमेरिकेसोबत सामील झाले नव्हते.

तेलाच्या किमती भडकणार 

पाश्चात्य देशांना भीती आहे की, इराणसोबत पुन्हा युद्ध सुरू झाल्यास जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील. मात्र अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत इराणसोबत नवीन युद्ध सुरू करणे ट्रम्प यांना राजकीयदृष्ट्या प्रचंड महाग पडू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com