Pune News: अहमदाबादहून पुण्याला निघालेल्या विमानाचं थेट गोव्यात लँडिंग; प्रवाशांचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Pune Rain Update: पुण्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विमानसेवेलाही याचा फटका बसला. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे अहमदाबादहून पुण्याला येणारे इंडिगोचे विमान गोव्याला वळवण्यात आले.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, पुणे

Pune News: पुणे शहर आणि जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी पावसाने झोडपून काढले आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीसोबतच आता हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. लोहगाव विमानतळ परिसरात पावसाचा जोर आणि ढगाळ हवामानामुळे दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी झाल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून इंडिगोचे विमान गोव्याला वळवण्यात आले.

काय आहे नेमकी घटना?

अहमदाबादहून पुण्याच्या दिशेने झेपावलेले इंडिगोचे 6E522 हे विमान आपल्या नियोजित वेळेनुसार पुण्यात उतरणार होते. मात्र, पुण्यात पावसाचा जोर इतका प्रचंड होता की वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून विमान पुण्यात उतरवण्याचा धोका न पत्करता ते थेट गोव्याच्या दिशेने वळवले.
प्रवाशांचे हाल

Advertisement

(नक्की वाचा-  Pimpri-Chinchwad: सावधान! वाकडमध्ये प्रवास करताना होऊ शकते फसवणूक; पाहा VIDEO, नेमकं काय होतंय?)

विमान अचानक दुसऱ्या राज्यात वळवल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. अनेक प्रवासी तासनतास विमानात अडकून पडले, तर काहींचे पुण्यातील महत्त्वाचे कार्यक्रम हुकले.

पुण्याला पावसाचा तडाखा

पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे,  लोहगाव विमानतळावर येणारी इतर काही विमानेही हवेतच घिरट्या घालत होती. शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

(नक्की वाचा-  Ajanta Caves: अजिंठा लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये दहशत; अनेक पर्यटक अर्ध्यावरून माघारी)

विक्रमी पावसाची नोंद

पुण्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद गुरुवारी झाली आहे. पुणे शहरात 2 एप्रिल रोजी तब्बल 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हा एप्रिल महिन्यातील एका दिवसातील गेल्या 130 वर्षांतील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यापूर्वी 1896 साली 51.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. 
 

Topics mentioned in this article