Mumbai Local : लटकणाऱ्यांना रेल्वेचे 'हँडल', बंद दरवाजांपाठोपाठ आणखी एक विचित्र निर्णय

यासाठी रेल्वे २.४० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. डब्यांच्या छताला आडव्या जोडलेल्या रॉडवर हे हँडल बसवण्याच येणार आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Local Train : मुंब्रा येथील धावत्या लोकलमधून पडून चार प्रवाशांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर लोकलच्या डब्यातील अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची मागणी या अपघातानंतर जोर धरु लागली आहे. याशिवाय दरवाजात लटकणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त ग्रॅब हँडल बसवण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळी अनेक प्रवासी दरवाजात लटकलेले असतात. अशावेळी दरवाजात लटकणाऱ्या प्रवाशांना दरवाजा किंवा मधल्या रॉडला पकडून उभे राहावे लागते. अशावेळी अनेकदा हात सटकून धावत्या लोकलमधून प्रवाशांना खाली पडण्याचा धोका असता. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रेल्वेने ग्रॅब हँडल बसण्याचा निर्णय घेतला आहे. 

यासाठी रेल्वे २.४० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. डब्यांच्या छताला आडव्या जोडलेल्या रॉडवर हे हँडल बसवण्याच येणार आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल. एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या या कामासाठी निविदा देखील काढल्या आहेत. येत्या दोन वर्षांता हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हार्बर रेल्वेवर काही काही डब्यांना हे ग्रॅब हँडल बसवण्यात आले आहेत.   

स्वयंचलित दरवाजे बसवणार

लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. यापुढे आता मुंबई क्षेत्रात धावणाऱ्या सर्व उपनगरीय गाड्यांमध्ये गेट बंद करण्याची व्यवस्था असेल.  ज्या नवीन  गाड्या येणार आहेत त्यांना स्वयंचलित दरवाजे असणार आहेत.याच्यात आयसीएफद्वारे ज्या लोकल आहेत त्यांना रेट्रो फीट माध्यमातून दरवाजे लावणार आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article