संजय तिवारी, नागपूर
इंजिनिअर तरुणीने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना नागपूरमधून समोर आली आहे. तरुणी मृत्यूआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये रुममेटसह दोघांना आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे. फेक व्हिडिओ बनवून बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वैशाली सिद्धार्थ खडसे असं 28 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. मृत वैशाली ही नागपूरच्या मानकापूर परिसरातील रहिवासी होती. पुणे येथील एका मोठ्या कंपनीत ती चांगल्या पदावर कार्यरत होती. मृत्यपूर्वी वैशालीने मराठी आणि इंग्रजीत सुसाईड नोट लिहून ठेवली आहेत.
(नक्की वाचा- Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
सुसाईड नोटमध्ये तिने लिहिलं की, काही लोक माझे धर्माविरुद्ध खोटे व्हिडीओ बनवत आहेत. माझ्यासारखी दिसणाऱ्या मुलीच्या नावाने मला फसवलं जात आहे. माझा फोन देखील 4 मार्चला इंदोर विमानतळावरून चोरीला गेला होता. मोबाईल बिल नसल्याने पोलिसांनी देखील माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. माझी प्लीज मदत करा. मी स्वत:हून कधीच धर्माविरुद्ध वागण्याचा विचार पण नाही करू शकत नाही.
( नक्की वाचा : Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं! )
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये तिने बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून दोघांना जबाबदार ठरवले आहे. पुणे येथील रूम मेटने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील यात आरोप करण्यात आला आहे.
वैशाली पुण्याहून 15 दिवसांपूर्वी नागपूरला घरी परतली होती. नागपूरला तिचे वडील आणि भाऊ-वाहिनी राहतात. घटनेच्या वेळी तिचा भाऊ पत्नीसह सासरवाडीला गेला होता. तर वडील घराबाहेर गेल्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचललं. मागील काही दिवसांपासून ती मानसिक तणावात होती. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.