"ईडीच्या भीतीमुळे महायुती सरकारसोबत गेलो", 'त्या' पुस्तकातील दाव्यांवर भुजबळ म्हणाले...

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई लिखित '2024, द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया' या पुस्तकात छगन भुजबळांबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

ईडीच्या भीतीमुळे माझ्यासह अनेक नेते महायुती सरकारमध्ये गेले, असं छगन भुजबळ यांना म्हटल्याचा उल्लेख '2024 द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया' पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकातील हा मजकूर समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मात्र छगन भुजबळ यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. भुजबळांना पत्रकार परिषद घेत यावर खुलासा केला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छगन भुजबळ यांनी म्हटल की, मी अशा पद्धतीची कोणतीही मुलाखत दिलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही सगळे सरकारसोबत गेलो असे आरोप आमच्यावर सातत्याने केले गेले. मात्र मला कोर्टाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लीन चीट दिली आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार असतानाच मला कोर्टाने क्लीन चीट दिली होता. कोर्टाच्या निकालानंतर मी त्यांना आणि पवार साहेबांना पेढेही दिले होते. 

(नक्की वाचा-  मराठा मतांची धास्ती, मुलाच्या पराभवाच्या भीतीने रावसाहेब दानवेंची भाषा बदलली?)

मला तुरुगांत जायची भीती आहे, इतरही जे काही आरोप आहेत ते हे सर्व आरोप मी फेटाळत आहेत. आम्ही सर्वजण विकासाच्या मुद्द्यावर पक्षातून बाहेर पडलो.  पक्ष फुटला त्यावेळी  मी एकटाच नव्हतो. 54 लोकांना त्यावर सह्या केल्या होत्या. आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे असं अनेकांना वाटत होतं. त्या सर्वांवर ईडीच्या केसेस नव्हत्या. आमच्यासोबत आजही जे आहेत त्या सर्वांवर ईडीच्या केस नाही, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं. 

पुढे भुजबळांनी म्हटलं की, आम्ही सरकारमध्ये आलो त्यामुळे आम्ही मतदारसंघांच विकास करु शकलो. आम्ही सर्वांनी जो निर्णय घेतला, त्याचा फायदा आम्हाला विकास करण्यासाठी होत आहे. मात्र पुस्तकात असं का छापलं गेले याची मला महिती नाही. 

Advertisement

निवडणुकीच्या वेळेला असं छापलं जातंय, मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्यासाठी असं केलं जातंय का? मला माहिती नाही. पुस्तक मी अजून वाचलेलंन नाही. मी ते मिळवून वाचेल. आमच्या वकीलांसोबतही मी चर्चा करेन. चुकीचं जे जे काही असेल त्यावर निवडणुकीनंतर कायदेशीर कारवाई करेन, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं. 

( नक्की वाचा : महायुती आणि मविआचे जाहिरनामे काय सांगतात? मत देण्यापूर्वी वाचा सर्वांची आश्वासनं )

पुस्तकात नेमकं काय आहे?

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई लिखित '2024, द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया' या पुस्तकात छगन भुजबळांबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. या पुस्तकातील मजकुरानुसार, एका मुलाखतीत छगन भुजबळांनी भाजपसोबत महायुतीत सरकारमध्ये  जाण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे. ईडीपासून सुटका व्हावी यासाठी माझ्यासह अनेक नेते भाजपसोबत जाण्यास तयार झाले. 

Advertisement

या पुस्तकात लिहिलंय की, "माझ्यासाठी (छगन भुजबळ) तर ईडीपासून सुटका म्हणजे एक पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते."

राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकावरील कोणत्या गोष्टींवर  भुजबळांनी घेतला आक्षेप

  • अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी ईडीपासून पिच्छा सोडविण्यासाठी भाजपसोबत सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला..
  • वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सोमोरे जायचे असा प्रश्न होता. आधी १०० कोटींच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती.
  • अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही.
  • तुरुंगात असताना भाजपमघ्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता. तेव्हा आता ते मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत. 
  • मला, देशमुख आणि मलिकांना ईडीने अटक केली होत. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपसोबत हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. 
  • ईडीबाबतचा विषय शरद पवारांकडे मांडण्यात आला होता. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला.

Topics mentioned in this article