Kalyan Accident News: कल्याण-नगर महामार्गावर मिक्सर ट्रकची टॅक्सीला भीषण धडक; 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Titwala Accident News: कल्याण-नगर महामार्गावरील रायता पुलावर मिक्सर ट्रकने काळी-पिली टॅक्सीला जोरदार धडक दिली असून, या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan News:  कल्याण-नगर महामार्गावरील रायता पुलावर आज एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. टिटवाळा जवळील रायता पुलावर प्रवाशांनी भरलेल्या एका इको टॅक्सीची आणि मिक्सर ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की टॅक्सीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. 

या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 2 जण मृत्यूशी झुंज देत आहेत. हे सर्व मृत प्रवासी मुरबाड तालुक्यातील रहिवासी असून ते कल्याणहून घराकडे परतत असताना हा काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Advertisement

(नक्की वाचा-  Ashok Kharat: अशोक खरातची कोठडीत चांगलीच जिरली! लोकांसमोर यायलाही घाबरतोय, पत्नीबद्दल विचारले असता...)

अपघाताचे मुख्य कारण

रायता पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तरीही प्रशासनाने घाईघाईत पुलाची एक मार्गिका (One Way) वाहतुकीसाठी खुली केली होती.  "प्रशासनाने योग्य ती काळजी न घेता पूल सुरू केला, त्यामुळेच एकाच मार्गिकेवर दोन्ही बाजूची वाहने आल्याने हा भीषण अपघात झाला," असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

अपघातात सापडलेल्या इको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते, ज्यामुळे अपघाताची तीव्रता आणि मृतांचा आकडा वाढला, असं पोलिसांनी म्हटलं. 

(नक्की वाचा-  Iran-US War: जगाला दुहेही धक्का! इराणनंतर आता अमेरिकेकडूनही होर्मुजवर नाकेबंदी; युद्ध पुन्हा भडकणार?)

ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात- किसन कथोरे

इको कारणे ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला आहे. या अपघातात एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात भूषण घोरपडे नावाचा महसूल अधिकाऱ्याचा देखील मृत्यू झाला आहे. ते मुरबाडला सर्कल अधिकारी होते, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. 

Topics mentioned in this article