लोकल विस्कळीत झाल्याचा जीवघेणा फटका ! कल्याणच्या वास्तूविशारदाचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती एक्स्प्रेसमध्ये प्रयत्न करणं कल्याणच्या वास्तूविशारदाच्या जीवावर बेतलं. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या गॅपमध्ये पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती एक्स्प्रेसमध्ये चढताना त्यांचा तोल गेला.
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

मुंबई आणि परिसरात रविवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. या पावसामुळे सोमवारी दिवसभर लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं ठाणे रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये अमरावती एक्स्प्रेसमध्ये प्रयत्न करणं कल्याणच्या वास्तूविशारदाच्या जीवावर बेतलं. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या गॅपमध्ये पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. अफजल फकीरा शेख (वय 45) असं या प्रवाशाचं नाव आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

मुंबई आणि परिसरात सोमवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. संध्याकाळी वाहतूक सुरु झाली पण लोकल उशिरानं धावत होत्या.  कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरात राहणारे वास्तूविशारद अफजल काही महत्त्वाच्या कामासाठी वाशीला गेले होते. वाशीहून घरी परतत असताना ठाणे रेल्वे स्टोशनवर ही दुर्दैवी घटना घडली.

अफजल वाशीहून लोकल पकडून ठाणे स्टेशनला आले. ठाणे स्टेशनमध्ये अमरावती एक्स्प्रेस आली होती. लोकल सेवा विस्कळीत असल्यानं त्यांनी अमरावती एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या गॅपमध्ये पडले. सोमवारी रात्री ही घटना घडली. 

ट्रेंडींग बातमी - बाप-बेटे चालत आले आणि सरळ रेल्वेखाली झोपले! भाईंदरमधील काळजाचा थरकाप उडवणारा Video 

जखमी अफजल  यांना कळवामधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अफजल शेख यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे. अफजल यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांचा मुलगा एमपीएससीची परिक्षा देण्याची तयारी करीत आहे.एक मुलीनं फार्मसीचे शिक्षण घेतलंय.दुसरी मुलगी 12 वीच्या वर्गात शिकत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article