जाहिरात

आधरवाडी तुरुंगासमोरील 'त्या' बंगल्याची का होतेय चर्चा? KDMC अधिकाऱ्यांनी पाहणी करताच 'ते' सत्य आलं समोर

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तुरुंगासमोर कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेला महापौर बंगला धूळ खात पडलेला आहे.

आधरवाडी तुरुंगासमोरील 'त्या' बंगल्याची का होतेय चर्चा? KDMC अधिकाऱ्यांनी पाहणी करताच 'ते' सत्य आलं समोर
KDMC Mayor Bunglow News
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

KDMC Mayor Bunglow News :  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली.त्यानंतर पहिल्याच आठवड्यात महापौर आणि उपमहापौरांना महापालिकेकडून गाडी,गाडीचा चालक आणि लिपक,सुरक्षा रक्षक उपलब्ध करुन देण्यात आले नाहीत. यामुळे महापालिका प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर आवळण्यात आला होता. अशातच महापौर बंगल्याबाबतच्या नव्या चर्चेला उधाण आलं आहे. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तुरुंगासमोर कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेला महापौर बंगला धूळ खात पडलेला आहे. महापौर हर्षाली थविल यांनी आज या बंगल्याची पाहणी केली.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेला महापौर बंगला धूळ खात पडून आहे.

केडीएमसी महपौर बंगल्याच्या पाहणी दरम्यान शिंदे सेनेचे गटनेते विश्वनाथ राणे यांच्यासह शहर अभियंत्या अनिता परदेशी,सचिव किशोर शेळके आदी उपस्थित होते.महापौर बंगल्याच्या कामाला 2010 साली सुरुवात झाली होती.कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेला बंगल्यात एकही महापौर राहण्यासाठी गेले नाहीत.माजी महापौर विनिता राणे या महापौर बंगल्यात राहण्यास जाणार होत्या.पण त्या या बंगल्यात राहण्यासाठी गेल्या नाहीत. 

नक्की वाचा >> Mumbai Pune Traffic: "बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल, टोल वाढवायचा..", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट Viral

महापौर बंगला उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले

महापौर बंगल्याच्या उभारण्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले.त्यानंतर देखभाल दुरुस्तीवर पुन्हा 60 लाखांचा खर्च करण्यता आला.आता महापौरपदाची निवडणूक पार पडल्यावर महापौर बंगला चर्चेत आला आहे.महापौर थविल यांना महापौर बंगल्यात वास्तव्य करायचे आहे. कारण महापौर थविल  व्यावसायाने वकिल असल्या तरी त्या सामान्य कुटुंबातील आहेत. त्या मोहने परिसरातील एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहतात. 

नक्की वाचा >> Pune News : पुण्याच्या तळेगाव दाभाडेत रक्तरंजित थरार, दारू पार्टीत मित्राचा भयंकर शेवट, हादरंवून टाकणारं कारण

महापौर बंगला पाहणी दरम्यान गटनेते राणे यांनी म्हटलंय की,"महापौर बंगला बांधलेला आहे.बंगल्याची वास्तू चांगली आहे.पण तेथील फर्निचर खराब झाले आहे. त्या ठिकाणी थोडीफार डागडुजी करुन त्यात महपौर वास्तव्य करणार आहेत".शहर अभियंत्या परदेशी यांनी सांगितले की,"बंगल्याचे बांधकाम चांगले आहे.पाच वर्षापासून बंगला बंद अवस्थेत होता. त्याठिकाणी रंग आणि फर्निचरचे काम लवकरात लवकर करुन घेतले जाईल".

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com