जाहिरात

Pune News : पुण्याच्या तळेगाव दाभाडेत रक्तरंजित थरार, दारू पार्टीत मित्राचा भयंकर शेवट, हादरंवून टाकणारं कारण

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे हत्येची भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दारू पिऊन गप्पा मारत असताना हा धक्कादायक प्रकार घडला.

Pune News : पुण्याच्या तळेगाव दाभाडेत रक्तरंजित थरार, दारू पार्टीत मित्राचा भयंकर शेवट, हादरंवून टाकणारं कारण
Pune Talegaon Dabhade Crime News
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Pune Crime News :  पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे हत्येची भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दारू पिऊन गप्पा मारत असताना आईवरून शिवी दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने त्याच्या मित्राच्या डोक्यात दगड घातला आणि त्याची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

दारूच्या नशेत मित्रांच्या गप्पा सुरु होत्या आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण आणि आरोपी हे दोघे मित्र असून घटनेच्या वेळी ते एकत्र बसून दारू पित होते. दारूच्या नशेत त्यांच्यात गप्पा सुरू असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात एकाने दुसऱ्याच्या आईला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.आपल्या आईचा अपमान सहन न झाल्याने संतप्त झालेल्या मित्राने जवळच असलेला दगड दुसऱ्याच्या डोक्यात घातला.

नक्की वाचा >> Good News: पैशांमुळे मुलीचं लग्न थांबणार नाही, 'या' योजनेची देशभरात चर्चा..कोणत्या कुटुंबांना मिळणार लाभ?

या गंभीर हल्ल्यात संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, घटनेमागे आणखी काही कारणे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com