KDMC Latest News : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अजब कारभार समोर आला आहे.शहरात अनधिकृत होर्डिंग किती आहेत?हे मोजण्यासाठी एका संस्थेला 20 लाख रुपये देण्याचे मंजूर केले होते.परंतु, महापालिकेच्या महासभेत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे यांनी हा विषय उपस्थित करुन त्यावर मोठा आक्षेप घेतला आहे.हे पैसे संबंधित संस्थेला देऊ नयेत,या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक पोटे यांनी केली आहे. शहरात किती अनधिकृत होर्डिंग आहेत? हे एक व्यक्ती दोन दिवसात मोजून सांगतो. पण त्यासाठी 20 लाख रुपयांचा खर्च कशाला?,असा सवाल पोटे यांनी उपस्थित केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात नगरसेवक पोटे यांनी म्हटलंय की,गेली पाच वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट होती.उत्पन्नाचे सोर्स आपल्या मालमत्ता आहेत.शहरातील होर्डिंगच्या माध्यमातून उत्पन्न येते. होर्डिंगच्या माध्यमातून 5 कोटीचे उत्पन्न मिळते,असे महापालिकेने दाखविले आहे.एक होर्डिंग 20 बाय 30 चे होर्डिंग भाड्याने घेतले वर्षाकाठी 8 ते 10 लाख रुपये एका होर्डिंगचे कंत्राटदाराला मिळतात. साधारणत 100 अधिकृत होर्डिंग पकडले तर 120 कोटी रुपये कंत्राटदाराला वर्षाला मिळतात. कंत्राटदार महापालिकेला फक्त 5 कोटी रुपये देतो.
नक्की वाचा >> Ashok Kharat: अशोक खरात HIV पॉझिटिव्ह? त्या व्हायरल व्हिडीओनं खळबळ, "हजार बायका पोरं संकटात.."
महापालिकेने अनधिकृत होर्डिंग मोजण्यासाठी नेमली एक संस्था
त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग किती?असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यासाठी महापालिकेने अनधिकृत होर्डिंग मोजण्यासाठी एक संस्था नेमली आहे. त्या कामासाठी 20 लाख रुपये महापालिका त्या संस्थेला कामाच्या बदल्यात देणार आहे. होर्डिंग मोजण्याचे काम संस्थेला न देता शहरातील होर्डिंग तयार करणाऱ्यांना हे काम दिले, तर शहरात किती होर्डिंग आहेत, याची माहिती ते दोन दिवसात देतील.
नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंची विधानभवनातील 'हजेरी' चर्चेचा विषय; महिनाभरात फक्त 4 वेळा उपस्थिती, आता 'ती' संधी गमावणार?
प्रशासनाला शहरातील अनधिकृत होर्डिंग शोधण्यासाठी एक वर्ष लागतं. गेल्या पाच वर्षात होर्डिंगच्या प्रकरणी प्रशासनाने जो भ्रष्टाचार केला आहे.त्याचे ऑडिट केले जावे. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.ज्या संस्थेला महापालिकेने होर्डिंग सर्वेक्षणाचे काम दिले आहे.त्याला कामाचे पैसे दिले जाऊ नयेत.जे महापालिकेला टॅक्स आणि भाडे देत नाहीत,अशा सर्व अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी. मुंबईला होर्डिंग पडून काही जणांचा मृत्यू झाला. कल्याणमध्येही होर्डिंग पडल्याची घटना घडली होती. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, अशी माहिती कल्याणचे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.