जाहिरात

उद्धव ठाकरेंची विधानभवनातील 'हजेरी' चर्चेचा विषय; महिनाभरात फक्त 4 वेळा उपस्थिती, आता 'ती' संधी गमावणार?

संपूर्ण अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानभवनातील मर्यादित उपस्थिती आता राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरली आहे.

उद्धव ठाकरेंची विधानभवनातील 'हजेरी' चर्चेचा विषय; महिनाभरात फक्त 4 वेळा उपस्थिती, आता 'ती' संधी गमावणार?
Shivsena UBT Uddhav Thackeray News
मुंबई:

जुई जाधव, प्रतिनिधी

Uddhav Thackeray Attendance Legislative Assembly Building : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप झाला. 23 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या महिनाभराच्या कामकाजात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक खडाजंगी पाहायला मिळाल्या.मात्र,या संपूर्ण अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानभवनातील मर्यादित उपस्थिती आता राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरली आहे. 23 फेब्रुवारी रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मोठ्या गाजावाजात सुरू झाले. तेव्हापासून आज या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी फक्त 4 वेळा विधानभवनात पाऊल ठेवलं. 

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीच्या तारखा खालीलप्रमाणे

​23 फेब्रुवारी: अधिवेशनाचा पहिला दिवस.
​6 मार्च: अर्थसंकल्पीय चर्चा आणि इतर घडामोडींचा काळ.
​16 मार्च: कामकाजाचा एक महत्त्वाचा दिवस.
​24 मार्च: अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि निरोप समारंभ.

एकीकडे राज्याचे राजकारण तापलेले असताना आणि विरोधक म्हणून सरकारला धारेवर धरण्याची संधी असताना,ठाकरे गटाच्या सर्वोच्च नेत्याची ही कमी उपस्थिती कायमच अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत.सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवणे अपेक्षित असताना,या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीत त्यांनी केवळ दोन वेळा भाषण केले.विशेष म्हणजे,ही दोन्ही भाषणे धोरणात्मक निर्णयांपेक्षा औपचारिक स्वरूपाची अधिक होती.

नक्की वाचा >> Ashok Kharat: अशोक खरात HIV पॉझिटिव्ह? त्या व्हायरल व्हिडीओनं खळबळ, "हजार बायका पोरं संकटात.."

1. अजित पवार यांचा शोकप्रस्ताव

 अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावर बोलताना त्यांनी श्रद्धांजली वाहिली 

2. निरोप समारंभ:

काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी निरोप समारंभाच्या निमित्ताने आपले दुसरे भाषण केले.

महत्त्वाच्या जनहिताच्या मुद्द्यांवर किंवा राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत त्यांच्याकडून आक्रमक भूमिकेची अपेक्षा शिवसैनिकांना होती,मात्र त्यांनी मोजक्याच उपस्थितीवर भर दिल्याचे दिसून आले.उद्धव ठाकरे यांची ही निवडक उपस्थिती विरोधकांच्या टीकेचे आयते कोलीत ठरली आहे. माजी मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरे यांनी संसदीय कामकाजाकडे गांभीर्याने पाहिले नाही. परंतु मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे सभागृहात येऊन पूर्ण वेळ बसायचे तेवढेच काय ते.

नक्की वाचा >> Pune News : पुणेकरांनो घराबाहेर पडताय? पुण्यात पेट्रोल-डिझेलचा साठा किती? समोर आली सर्वात महत्त्वाची अपडेट

महिनाभराच्या या काळात उद्धव ठाकरेंनी केवळ चार वेळा लावलेली हजेरी आणि दोनदा केलेले भाषण,हे या अधिवेशनातील एक विशेष हायलाईट ठरले आहे. पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुका काही महिन्यात लागणार आहेत त्यावेळी उद्धव ठाकरेंना पुन्हा संधी दिली जात आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com