Kalyan News: आधारवाडी जेलमध्ये जोरदार राडा! कैद्याला पाय तुटेपर्यंत मारला, पडले 16 टाके, राड्याचं कारण काय?

या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • आधारवाडी जेलमध्ये जोरदार राडा झाला आहे
  • ओरोपीला पोलिसांनीच मारहाण केल्याचा आरोप आहे
  • आरोपी अक्षयच्या पायाला सोळा टाके पडले आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कल्याण:

अमजद खान 

आधारवाडी जेल हे नेहमीच चर्चेत असते. इथं काही ना काही घटना या घडत असतात. या जेलमधून कैदी पळून गेल्याच्या ही घटना घडल्या आहेत. तर कधी हाणामारी होतानाही आपण पाहीलं आहे. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. इथं शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला जबर मारहाण झाली आहे. त्याला इतके मारले गेले आहे की त्याच्या पायाला तब्बल 16 टाके पडले आहेत. ही मारहाण पोलिसांनीच केल्याचा आरोप संबंधीत कैद्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर जेल प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.    

बदलापूर येथील एका प्रकरणात अक्षय कुरतडकर हा अटकेत आहे. तो सध्या आधारवाडी कारागृहात बंद होता. त्याला जेलमधील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याच्या कुटुंबीयांनी हा आरोप केला आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर जेल प्रशासन अलर्ट मोडवर आला आहे. अक्षय कुरतडकर जेलमध्ये असताना तो आंघोळ करून परत बैरकच्या दिशेने येत होता. त्याच वेळी दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही मारहाण जबर होती.

Advertisement

नक्की वाचा - Facebook Down: जगभरात फेसबुक डाऊन! युजर्सना लॉगइन करण्यात अडचण, स्क्रीनवर दिसतोय एकच मेसेज

या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पायाला 16 टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अक्षयच्या मावशी यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात जेल प्रशासनाचा संबंधित विभागाला याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र कोणत्या कारणावरून ही मारहाण झाली हे अजूनही समजू शकलेले नाही. 

नक्की वाचा - Success story: एका रात्रीत 77 कोटी कमवाले! 'त्या' तरुणाला हे कसे जमले? थक्क करणारी कहाणी

याबाबत जेल प्रशासना सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकलेला नाही. आरोपीच्या मावशी उज्वला आचरेकर यांनी ही मारहाण पोलिसांनीच केली आहे असे म्हटले. त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे असं ही त्यांनी सांगितलं. पोलिसांवरच मारहाणीचा आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. यात आता जेल प्रशासन आणि पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 


Topics mentioned in this article