जाहिरात

Facebook Down: जगभरात फेसबुक डाऊन! युजर्सना लॉगइन करण्यात अडचण, स्क्रीनवर दिसतोय एकच मेसेज

जेव्हा युजर्स फेसबुकवर लॉगइन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा त्यांच्या स्क्रीनवर एकच मेसेज फ्लॅश होत आहे.

Facebook Down: जगभरात फेसबुक डाऊन! युजर्सना लॉगइन करण्यात अडचण, स्क्रीनवर दिसतोय एकच मेसेज
  • रविवारी दुपारी फेसबुकच्या सेवेमध्ये तांत्रिक अडचणींमुळे जगभरातील युजर्सना लॉगइन करताना समस्या उद्भवली होती
  • डेस्कटॉप व्हर्जन वापरणाऱ्यांना अधिक त्रास सहन करावा लागला कारण त्यांना फेसबुक साइट ऍक्सेस करता येत नव्हती
  • फेसबुकच्या स्क्रीनवर युजर्सना अकाउंट तात्पुरते अनुपलब्ध असल्याचा संदेश दिसत होता

फेसबूक वापरणाऱ्यांना रविवारी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. काही समजण्या आता फेसबूक डाऊन झाले. त्यावर लॉगइन करणे अवघड झाले होते. त्यामुळे युजर्सना नाहक त्रास सहन करावा लागला.  सोशल मीडिया क्षेत्रातील आघाडीचे नेटवर्क असलेले फेसबुक जगभरात डाऊन झाले होते. Sunday दुपारनंतर अचानक फेसबुकच्या सेवेमध्ये मोठी अडचण निर्माण झाली. यामुळे जगभरातील करोडो युजर्सना आपल्या अकाउंटमध्ये लॉगइन करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे युजर्समध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा - Success story: एका रात्रीत 77 कोटी कमवाले! 'त्या' तरुणाला हे कसे जमले? थक्क करणारी कहाणी

जेव्हा युजर्स फेसबुकवर लॉगइन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा त्यांच्या स्क्रीनवर एकच मेसेज फ्लॅश होत आहे. यामध्ये डेस्कटॉप व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना अधिक फटका बसला आहे.  त्यांना साईट ॲक्सेस करता येत नसल्याचे समोर आले आहे. अनेकांनी लॉगइन करण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण ते लॉगइन होत नव्हते. मात्र ही अडचण का येत आहे याचा कोणताही मेसेज येत नव्हता. फेसबूककडून ही तसं काही सांगितलं जात नव्हतं. जवळपास दोन तास ही अडचण येत होती. काही वेळाने फेसबूक सुरू होईल या आशेवर युजर्स होते.  

नक्की वाचा - Barkha Trehan: अभिजीत दीपकेवर शाई फेकणारी बरखा त्रैहन कोण? थेट अत्याचारातील आरोपीशी आहे कनेक्शन

युजर्सना स्क्रीनवर पुढील मेसेज दिसत आहेत. "अकाउंट तात्पुरते अनुपलब्ध आहे. साईटवरील काही तांत्रिक समस्येमुळे तुमचे अकाउंट सध्या उपलब्ध नाही. ही समस्या लवकरच सुटण्याची आम्हाला आशा आहे. कृपया काही मिनिटांनंतर पुन्हा प्रयत्न करा." या तांत्रिक समस्येवर फेसबुकचे इंजिनिअर्स काम करत असून, सेवा कधी पूर्ववत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेसबूककडून काही वेळाने ही माहिती देण्यात आली. त्यामुळे ही सेवा कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Latest and Breaking News on NDTV
संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com