Kalyan : 'माझी कपिल पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्याशी लढाई' कल्याणच्या माजी भाजपा आमदाराची क्लीप Viral

Kalyan : भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची एक क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये कपिल पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्याशी माझी लढाई आहे असा दावा पवार यांनी या  कथित क्लिपमध्ये करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News : कल्याण भाजपामधील अंतर्गत वाद उघड झाला आहे.
कल्याण:


Kalyan News : कल्याणमधील म्हाडाच्या शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकास मुद्यावरुन भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शिवसेनेचे (शिंदे) विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. कल्याणमध्ये या प्रकरणात महायुतीचे आजी-माजी आमदार आमनेस-सामने आले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपामधील अंतर्गत वाद उघड झाला आहे. 

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची एक क्लीप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये भाजपचे माजी आमदार पवार हे एका महिलेशी बोलत आहे. या प्रकल्पात कपिल पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्याशी माझी लढाई आहे असा दावा पवार यांनी या  कथित क्लिपमध्ये करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान ही कथित ऑडिओ क्लीप सगळ्यांना ऐकविण्यात आला. या संदर्भात माजी आमदार पवार यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितेल की, एक महिला जी विराेधात जात होती. ती त्या बिल्डरची बाजू घेत होती. शिवसेना नेते गोपाळ लांडगे भांडत होते. ऑर्डर त्यांच्या विरोधात गेल्याने कपील पाटील,  बाळ माने हे मदत करीत असल्याचे मला रविंद्र चव्हाण यांनी काल सांगितले. ही ऑडिओ क्लीप कपिल पाटील सगळ्यांना ऐकवत आहेत. 

( नक्की वाचा : Kalyan News : म्हाडाच्या प्रकल्पावरुन कल्याणमध्ये महायुतीत चांगलीच जुंपली, आजी-माजी आमदार आमने-सामने )

आमदार भोईर यांना  ही क्लीप कपिल पाटील यानी दिली असेल. कल्याणकरांचा विषय विधीमंडळात येऊ नये यासाठी हे सगळे फिरत होते मी साक्षीदार असल्याचे स्पष्टीकरण नरेंद्र पवार यांनी दिले आहे. नरेंद्र पवार यांनी आपल्याच पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article