
कल्याणमधील शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकास मुद्यावरुन महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर हे प्रकरण चिघळविण्याचा आरोप केला आहे. तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आमदार भोईर बिल्डरची वकिली करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र या प्रकरणामुळे शांतीदूत सोसायटीच्या रहिवासीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण?
शांतीदूत सोसायटीचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प म्हाडाने कल्याणमधील एका बिल्डरला दिला आहे. या सोसायटीचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे. या सोसायटीतील लोक अनेकांकडे न्यायासाठी खेटे मारत आहे. मात्र त्यांना न्याय मिळत नाही. यासाठी भाजपचे माजी आमदार पवार हे उद्या (रविवार 3 ऑगस्ट) उपोषण करणार आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सोसायटीतील काही नागरीकांनी आज (शनिवार 2 ऑगस्ट) एक बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे आमदार भोईर यांच्यासह शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील आणि संजय पाटील उपस्थित होते.
( नक्की वाचा : Pune Dargah Controversy : पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचे आक्रमक आंदोलन, अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी अल्टीमेटम )
या बैठकीनंतर आमदार विश्वनाथ भोईर सांगितले. या विषयाची दखल केंद्रीय मंत्री निर्मला सितारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली. या प्रकल्पासंदर्भात विधी मंडळात मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनापश्चात म्हाडाकडून अहवाल मागवून संबंधितांची बैठक घेतली जाणार आहे. सरकार हा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असताना त्या आधीच भाजपचे माजी आमदार पवार यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. हे प्रकरण चिघळवण्यात येत असल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे. तसंच त्यांनी पवार यांना उपोषण न करण्याचं आवाहन केलंय.
'आमदारकडून बिल्डरची वकिली'
याबाबत माजी आमदार पवार यांनी आमदार भोईर यांच्यावर सडेतोड टिका केली आहे. त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. बिल्डरने निवडून दिलेले नाही. ते बिल्डरची वकीली करीत आहे. खरे तर हा प्रश्न त्यांनी विधीमंडळा मांडला पाहिजे हाेता. म्हणून आम्हाला पुण्यातील आमदार आणि किसन कथोरे यांची मदत घ्यावी लागले. तुम्ही माझ्याशी बोला. माझ्यासोबत लोकांच्या हक्कांसाठी तुम्ही उपोषणाला बसले पाहिजे. बिल्डरच्या बाजूने पत्रकार परिषद काय घेता असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world