अमजद खान
कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तिथेच रिक्षा स्टँड, बस स्टँड, मार्केट, फेरीवाले, जवळच कोर्ट त्यामुळे कल्याण स्थानाक बाहेर नेहमीच गर्दी पाहायला मिळते. या गर्दीमुळे वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली आहे. अशा काही वेळा गाडी पार्क करण्याचाही प्रश्न निर्माण होतो. नो पार्कींगमध्ये अनेक वेळा गाड्या पार्क केल्या जातात. यात सर्व सामान्यां बरोबर पोलीस ही आपली वाहन पार्क करताना दिसतात. पण त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. पण आता कल्याण वाहतूक पोलीसांनी थेट कारवाईचा बडगा उगारत अशा पोलीसांकडून दंडच वसूल केला आहे.
कल्याण स्टेशन परिसरात लोक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यात पोलिसांची वाहने ही असतात. अशा दुचाकी गाड्यांवर कल्याणच्या वाहतूक विभाागने दंडात्मक कारवाई केली आहे. अशा पोलीसांकडून चुकीच्या जागी गाडी लावल्या मुळे दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नागरिकांना मात्र हायसे वाटले आहे. त्यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. शिवाय वाहतूक पोलिसांनी ही कारवाई सातत्याने करावी, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे. त्यामुळे नो पार्कींगमध्ये गाडी लावणाऱ्यांना जरब बसेल असं त्यांचं म्हणणं आहे.
नक्की वाचा - Dombivli News: ठाकरे गटाच्या नेत्यावर हल्ला, गाडी फोडली, हल्लेखोर निघाला...
कल्याण डोंबिवलीत स्टेशन परिसरात मोकळ्या जागेवर लाोक त्यांची दुचाकी उभी करतात. त्यामुळे नागरीकांसह वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. कल्याण स्टेशन परिसरात एकीकडे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामं सुरु आहेत. दुसरीकडे सिमेंटचे रस्ते बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे सगळे असताना काही लोक सकाळच्या वेळी कामावर जाताना गाड्या कुठेही पार्क करुन जातात.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
त्यात पोलिसांच्या गाडयांचाही समावेश असतो. अशा दुचाकी गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एकूण 58 दुचाकी गाड्यावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांच्या गाड्यांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे.मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास वाहतूक पोलीसांनी नकार दिला आहे. पोलीसांवरच झालेल्या या कारवाईचे कल्याणच्या नागरिकांनी स्वागत केली आहे. शिवाय या कारवाईत सातत्य हवे अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.