Kalyan News: कल्याणमध्ये नशेखोरांचा हैदोस! खात्री पटल्याशिवाय लोक उघडत नाहीत दार

घरातील भाडोत्री जोपर्यंत त्याची खात्री झाली नाही की त्याचा मालक दार ठोठावत आहे, तोपर्यंत त्याने त्याचे दार उघडले नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

रात्री अपरात्री लोकांच्या घरांच्या खिडक्या तोडणे, घरांवर दगडफेक करणे, रस्त्यात महिला दिसली की तिची छेड काढणे हा कल्याणमधील नशेखोरांचा रोजचा धंदा बनला आहे. नशेखोरांनी कल्याणच्या नेतिवली परिसरात अक्षरश: हैदोस घातला आहे. नशेखोरांपासून नागरीक त्रासले आहेत. याबाबत शिवेसना शिदे गटाचे पदाधिकारी संदीप माने यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र वारंवार तक्रार करुन देखील ठोस कारवाई केली जात नसल्यााने नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातले नागरिक हे नशेखोरांच्या दहशतीच्या सावटाखाली वावरत असल्याचं चित्र आहे.  

कल्याण पूर्व परिसरात नशेखोरांनी हैदास घातला आहे. कल्याणचे डीपीसी अतुल झेंडे यांनी या नशेखोरांच्या विरोधात मोठी मोहिम सुरु केली होती. पोलिसांची दहशत या नशेखोरांमध्ये पसरली होती. अनेक नशेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांची जेलवारी करण्यात आली होती. पण आता पुन्हा नशेखोरांनी डोके वर काढले आहे. कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात नशेखोरांनी काही दिवसापासून हैदास घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे नागरिकंमध्ये भितीचे वातावरण आहे. ते भितीच्या छत्रछायत राहात आहेत. 

नक्की वाचा - Mhada News: म्हाडाची घरं आणखी स्वस्त होणार, नव्या किंमत ऐकून तुम्ही ही व्हाल आवाक

रात्री अपरात्री रहिवाशांची दारं हे नशेखोर ठोठावतात. रस्त्यावरील महिलांची छेड काढतात. तसेच घरांच्या खिडक्यांची तोडफोड ही करतात. घरावर दगड ही फेकले जातात. हे सगळे प्रकार या नशेखोरांकडून केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी तर या नशेखारांने कहरच केला. एका घराची लाईट कापली. हे घर चार दिवस अंधारात होते. परिस्थिती अशी आहे की, जेव्हा एनडीटीव्हीचे प्रतिनिधी या परिसरात गेले, त्यावेळी ही घरातील व्यक्तीने बाहेर कोण आहे याची खात्री केल्यानंतरच दरवाजा उघडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संदीप माने ही उपस्थित होते. 

नक्की वाचा - Navratri 2025: नवरात्रात घरात 'या' गोष्टी आणल्याने वाढते सुख-समृद्धी, मिळतो देवी भगवतीचा आशीर्वाद

घरातील भाडोत्री जोपर्यंत त्याची खात्री झाली नाही की त्याचा मालक दार ठोठावत आहे, तोपर्यंत त्याने त्याचे दार उघडले नाही. अखेरीस भाडोत्रीने मालकास मोबाईल केला. मालक आल्याची खात्री केली. तेव्हा कुठे त्याने दार उघडले. इतकी दहशत नशेखोरांची असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. या प्रकरणी संदीप माने यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. हैदोस घालणाऱ्या नशेखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा. त्यांना चांगलीच अद्दल घडवावी अशी मागणी केली आहे. या पूर्वीही या प्रकरणी पोलिसांकडे माने यांनी तक्रार केली होती. मात्र पोलिसांकडून याबाबत ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे माने यांनी सांगितले.

Advertisement