Kalyan News : कल्याणमधील 'या' सोसायटीच्या प्रत्येक घरातील व्यक्ती आजारी! पालिका कधी लक्ष देणार?

Kalyan News :  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभाराचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:


अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan News :  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभाराचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरातील नव एव्हरेस्ट सोसायटीतमधील प्रत्येक घरातील दोन ते चार नागरीक दूषित पाण्यामुळे आजारी आहे. दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याने सोसायटीने कल्याण डोंबिवली  महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पाणी खात्याच्या अधिकारी आले. त्यांनी दूषित पाण्याचे  नमूने तपासणीकरीता नेले. मात्र त्याचा रिपोर्ट अद्याप काही आलेला नाही.  येत्या दोन दिवसात ही समस्या दूर झाली नाही तर महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष वरुण  पटील यांनी दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण? 

कल्याणमधील नव एव्हरेस्ट सोसायटीमध्ये 72 फ्लॅट्स आहेत. त्यामध्ये 72 कुटुंब राहतात.   या सोसायटीला गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरठा केला जात आहे. त्यामुळे सासायटीतील प्रत्येक घरातील दोन ते चार सदस्य आजारी पडले आहे. काही जणांना उलटया जुलाबाचा त्रास होत आहे. काही मधूमेहाच्या आजाराचे रुग्ण आहे. त्यांना दूषित पाण्याचा त्रास झाल्याने त्याना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. लहान मुलांना टा'यफा'ईडचा आजार झाला आहे. हे आजार दूषीत पाण्याने झाल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. 

Advertisement

सोसायटीत राहणाऱ्या रोझ नेल्सीन या महिलेने सांगितले की, 20 दिवसापासून दूषित पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यांचे सासरे मधूमेहाचे रुग्ण आहे. त्यांच्या शरीरातील साखर अचानक खालावली आहे. त्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रोझ या सुद्धा आजारी पडल्या आहेत. त्या सुट्टी घेऊन फार काळ घरी राहू शकत नाही. घरी पाणी उकलून पितात. अक्वा गार्ड आहे. तरी देखील त्याचा काही उपयोग होत नाही. नळाला येणाऱ्या पाण्याचा रंग पिवळाजर्द आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Dombivli ' घोटाळ्यांची चौकशी करायला पाच वर्ष कमी पडतील', राज ठाकरेंसमोर राजू पाटील यांचा निशाणा )

साेसायटीचे सेक्रेटरी शेखर बर्वे यांनी सांगितले की, टसोसायटीला दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याने सोसायटीमधील प्रत्येक घरात दोन ते चार जण आजारी आहे. माझा नातू आजारी पडला. त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्या चाचण्या केल्या.  त्याला टायपाईड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे त्याला या आजाराची लागण झाली आहे. या प्रकरणी दोन वेळा महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानी अधिकारी पाठवून दूषित पाण्याचे नमूने नेले. त्याचा रिपोर्ट काय आला. हे सांगण्याची तसदी महापालिकेने घेतलेली नाही.

Advertisement

सोसायटीच्या नागरिकांनी या समस्येला त्रासून सोसायटीतील नागरीकांनी या समस्येला त्रासून भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांच्याकडे धाव घेतली. पाटील यांनी सोसायटीतील नागरीकांशी चर्चा केलीया समस्येवर येत्या दोन दिवसात तोडगा काढला नाही तर महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 

Topics mentioned in this article