अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिका कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मग ते कल्याण डोंबिवलीतील रस्ते असो की तिथले ट्राफीक असो. सार्वजनिक स्वच्छतेबाबतही कल्याणची चर्चा ही होतच असते. त्यात आणखी एका गोष्टीने सर्वांना लक्ष वेधले आहे. कल्याण पूर्वेत राहाणार एक तरुण सकाळी सकाळी हातात शौचालयाला जाणारं टमरेल घेवून केडीएमसीच्या मुख्यालयात दाखव झाला. त्याच्या एका हातात दात घासण्याचा ब्रश होता. दुसऱ्या हातात टमरेल होतं. शिवाय तो हाफपँटवरच दाखल झाला होता. त्याच्या या अचनाक एन्ट्रीने प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाली. पण हा तरुण असा का आला होता याची चर्चा मात्र चांगलीच रंगली होती.
कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरातील महात्मा फुले नगर आहे. तिथे मोठी वस्ती आहे. पण या ठिकाणी शौचालयाची दुरावस्था झाली आहे. या बाबत केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आला होता. शिवाय स्थानिकांनी त्यासाठी पाठपुरावा ही केली होता. पण ऐवढं करून ही त्यात काही ही सुधारणा झाली नाही. कोणती ही शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही. नागरिकांना त्यांच्याच हालावर सोडण्यात आलं.
त्यानंतर मात्र त्याच ठिकाणी राहाणार मनोज वाघमारे या तरुणाने केडीएमसी प्रशासनाला वेगळ्या प्रकारे समजवण्याची आयडिया केली. त्याने तरी प्रशासनाला जाग येते का? असा त्याने विचार केला. त्यातून मनोज वाघमारे हा तरुण केडीएमसी मुख्यालयात थेट टमरेल घेऊन पोहचला. त्यांनी टमरेल घेऊन केडीएमसी प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त केला. महात्मा फुले नागरातील शौचालय हे जुने आहेत. ते 24 वर्षापूर्वी बांधले होते. त्याची दुरावस्था झाली आहे.
त्याठिकाणी 14 सीट पैकी एकच सीट वापरण्या योग्य आहे. बाकी सीटची दुरावस्था झाली आहे. शौचालयातील पुरुष मुतारी आणि दिव्यांगाचे शौचालय तर बंदच आहे. या प्रकरणी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे 11 सप्टेंबर रोजी पत्र देऊन दुरुस्तीची मागणी केली होती. त्याची सहाय्यक आयुक्तांनी दखल घेतली नाही. अखेर वाघमारे यांनी हातात टमरेल घेत केडीएमसी मुख्यालय गाठले. केडीएमसी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. त्यांच्या एन्ट्रीने मात्र प्रशासनाची तारांबळ उडाली. पण त्यानंतर तरी केडीएमसी प्रशासनाला जाग येणार आहे का हा खरा प्रश्न आहे.