
अमजद खान
काँग्रेसचे पदाधिकारी प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे चिडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मामा पगारे यांना रुग्णालयाबाहेर गाठत भर रस्त्यात त्यांना साडी नेसवली होती. त्यांचे फोटो काढले गेले. त्यांचे व्हिडीओ बनवले गेले. ते व्हिडीओ सोशल मीडियीवर व्हायरलही झाली. मात्र मामा पगारे हे आपल्या भूमीकेवर ठाम राहीले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात ही दाखल करण्यात आले. दरम्यान या सर्व झालेल्या प्रकाराची माहिती थेट काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पर्यंत पोहोचली. राहुल गांधी यांना ही बातमी समजताच तातडीने मामा पगारे यांना फोन केला.
साडी नेसवण्याचा झालेला प्रकार हा मामा पगारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कानावर घातला. यावेळी थोरात हे काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीसाठी दिल्लीत होते. त्या वेळी त्यांनी थोरात यांनी झालेला सर्व प्रकार राहुल गांधी यांच्या कानावर टाकला. लगेचच राहुल यांनी मामा पगारे यांना फोन लावण्यास सांगितला. थोरात यांच्या फोनवरून राहुल यांनी पगारे यांच्या बरोबर संवाद साधला. झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. शिवाय तुम्ही घाबरू नका. काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे. तुमच्याबद्दल थोरातांना मला माहिती दिली असं ही राहुल त्यांना म्हणाले.
नक्की वाचा - Dombivli News: पंतप्रधान मोदींवर टीका महागात पडली, काँग्रेस नेत्याला थेट साडी नेसवली
पन्नास वर्षापासून तुम्ही काँग्रेसचे काम करत आहात. तुमच्या बद्दल आम्हाला आदर आहे. तुम्ही घाबरू नका. प्रदेश काँग्रेस तुमच्या मागे उभी राहील तसे निर्देश त्यांना देण्यात येतील असं आश्वासनही राहुल गांधी यांनी दिल्याचं मामा पगारे यांनी सांगितलं. शिवाय मुंबईत आल्यानंतर राहुल गांधी आपल्याला नक्कीच भेटतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान झालेल्या घटनेनंतर मामा पगारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथेच त्यांच्यावर उपचार ही सुरू आहेत.
नक्की वाचा - Kalyan News: कल्याणमध्ये नशेखोरांचा हैदोस! खात्री पटल्याशिवाय लोक उघडत नाहीत दार
काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही गोष्ट त्यांना महागात पडली. या कारणावरुन संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना भर रस्त्यात साडी नेसविली. या घटनेनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने बुधवारी कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी देवीच्या मंदिरात जाऊन देवीला साडी अर्पण केली. भाजप पदाधिकाऱ्यांना देवीने सुबुद्धी द्यावी असे साकडे घातले आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे अशी प्रतिक्रीया जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world