Kalyan News: तुमची सोसायटी सुरक्षित आहे? कल्याणमध्ये घरकाम करणारे आणि फेरीवाले पोलिसांच्या रडारवर, कारण काय?

Kalyan News: कल्याणमधील खडकपाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली. त्यांनी परिसरातील सर्व फेरीवाल्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News: कल्याण पोलिसांनी नागरिकांना खास आवाहन केलं आहे.
कल्याण:

Kalyan News:  कल्याण डोंबिवली परिसराला बांगलादेशी घुसखोरांपासून मुक्त करण्यासाठी आता पोलीस प्रशासन पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. मागील काही दिवसांत शहराच्या वेगवेगळ्या भागांत बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. 

विशेषतः हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये घरकाम करणारे मजूर आणि रस्त्यावरील फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी नागरिक असण्याची दाट शक्यता असल्याने खडकपाडा पोलिसांनी या सर्व संशयितांची सखोल चौकशी सुरू केली आहे.

Advertisement

पोलिसांची धडक कारवाई आणि फेरीवाल्यांची चौकशी

कल्याणमधील खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज (शनिवार 14 मार्च) पोलिसांनी मोठी कारवाई केली. त्यांनी परिसरातील सर्व फेरीवाल्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. 

यामध्ये त्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड आणि ते सध्या कुठे राहतात याच्या वास्तव्याचा पुरावा तपासला जात आहे. अनेकदा बनावट कागदपत्रांच्या आधारे हे नागरिक शहरात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे पोलीस प्रत्येक कागदपत्राची अतिशय बारकाईने तपासणी करत आहेत.

( नक्की वाचा : पुण्याची ती मुस्लीम तरुणी आणि आणि इंजिनिअर भावाचा क्रूर अवतार; बहिणीचा काटा काढत आईला दिलं 'सरप्राईज'! )

गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास

केवळ वास्तव्याचा पुरावाच नाही, तर या फेरीवाल्यांवर याआधी शहरात किंवा इतर कुठे कोणताही गुन्हा दाखल आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. खडकपाडा पोलीस या मोहिमेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. चौकशी दरम्यान जर कोणीही बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

या विशेष मोहिमेबद्दल माहिती देताना खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, आमच्या हद्दीतील सर्व फेरीवाल्यांच्या वास्तव्याच्या पुराव्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक कार्यरत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Amravati News: 'आदेश पाळणे आमच्या हातात नाही'; अमरावती झेडपी सीईओंचे कोर्टात थेट मंत्रालयावर खापर,प्रकरण काय? )

एखाद्या फेरीवाल्याचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड सापडला, तर त्यानुसार पुढील पावले उचलली जातील. तसेच शहरात कुठेही संशयास्पद बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे आढळल्यास सामान्य नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 

Topics mentioned in this article