Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशाची फसवणूक, 'ते' तिकिट दिलं चक्क 510 रुपयांना, नेमकं काय घडलं?

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशाची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Railway Station News

Kalyan Railway Station Viral News : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशाची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. फक्त 10 रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटावर मार्करने '5'हा अंक लिहून ते 510 रुपयांचे तिकीट असल्याचा बनाव करत एका प्रवाशाकडून 510 रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सारीकुल दिल मोहम्मद शेख (18)यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

फिर्यादी हावडा (पश्चिम बंगाल) येथे जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर आले असता, आरोपी अतुल अडलिंगे (वय 32,रा.सोलापूर) याने त्यांचा विश्वास संपादन केला.हावड्याचे रेल्वे तिकीट देण्याचे आमिष दाखवत त्याने फिर्यादीला 10 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट दिले. त्यानंतर त्या तिकिटावर मार्कर पेनने '5'हा अंक लिहून ते 510 रुपयांचे तिकीट असल्याचा भास निर्माण केला आणि त्याबदल्यात 510 रुपये घेत फसवणूक केली.

Advertisement

नक्की वाचा >> Ratnagiri News: सावधान! कोकणात फिरायला जाताय? 'या' समुद्रकिनाऱ्यावर घडली धडकी भरवणारी घटना

रेल्वे पोलिसांचं प्रवाशांना मोठं आवाहन

फिर्यादीने तात्काळ याबाबत रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम 318 (4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी अतुल अडलिंगे याला ताब्यात घेऊन अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान,रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की रेल्वे तिकिटे कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून खरेदी करू नयेत. तिकिटे नेहमी अधिकृत रेल्वे तिकीट काउंटरवरून किंवा अधिकृत UTS मोबाईल ॲपद्वारेच खरेदी करावीत.