Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण

Kalyan Dombivli Schools : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विनापरवाना सुरू असलेल्या 7 अनधिकृत शाळांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) हद्दीत अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत केडीएमसीच्या शिक्षण विभागाने 7 शाळा अनधिकृत घोषित केल्या असून, त्यातील 3 शाळांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षण प्रशासकीय अधिकारी भारत बोरनारे यांनी या कारवाईची पुष्टी केली असून आयुक्तांच्या मंजुरीनंतर तातडीने कारवाई केली जाणार आहे.

कोणत्या शाळांवर होणार गुन्हा दाखल?

  • बुद्धिस्ट इंटरनॅशनल शाळा, डोंबिवली.
  • सनराईज इंग्लिश स्कूल, टिटवाळा.
  • संकल्प इंग्लिश स्कूल (सरिता एज्युकेशन ट्रस्ट), बल्याणी-टिटवाळा.

(नक्की वाचा-  Viral Video : "अंकल वाचवा, अंकल सोडवा..." पेरू तोडल्याची चिमुकलीला भयंकर शिक्षा, माजी सैनिकाला बेड्या)

अनधिकृत ठरवलेल्या 7 शाळांची संपूर्ण यादी 

केडीएमसीने खालील शाळांना अनधिकृत ठरवले असून त्यातील काही शाळांच्या कागदपत्रांची प्रक्रिया (इरादा पत्र) सुरू आहे.

  • डोंबिवली: बुद्धिस्ट इंटरनॅशनल शाळा आणि सी. पी. गोयंका स्कूल (आयरे रोड).
  • टिटवाळा/बल्याणी: सनराईज इंग्लिश स्कूल आणि सरिता एज्युकेशन ट्रस्टचे संकल्प इंग्लिश स्कूल.
  • कल्याण: क्रेस्ट मोड इंग्लिश स्कूल (योगीधाम, प्रगत शिक्षण संस्था) आणि सिंघानिया स्कूल (उंबर्डे).

(नक्की वाचा- VIDEO: आवेश खानची मोठी चूक; लखनऊचा विजय पराभवात बदलला असता; नियम काय सांगतो?)

प्रशासनाचं आवाहन

दरवर्षी महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली जाते आणि प्रेस नोट काढली जाते. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून नेहमीच केला जातो. बेकायदेशीर शाळांमध्ये शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळवताना किंवा बोर्डाच्या परीक्षेला बसताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, "नागरिकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची अधिकृतता तपासावी," असे आवाहन भारत बोरनारे यांनी केले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article