Himachal Pradesh Viral Video: एका लहान मुलीने झाडाचा पेरू तोडला म्हणून तिला चक्क दोरीने बांधून क्रूरपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील बेहडाला गावात घडली आहे. एका माजी सैनिकाने केलेल्या या अमानवीय कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, देशभरातून या माजी सैनिकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
केवळ एका पेरूसाठी इतकी मोठी शिक्षा?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी रस्त्याने जात असताना एका घराच्या अंगणातील पेरूच्या झाडाची फांदी रस्त्यावर आली होती. त्या फांदीवरील पेरू तोडल्याचा राग मनात धरून घराचा मालक असलेल्या माजी सैनिकाने या चिमुकलीला पकडले. आरोपीने मुलीला घरात नेऊन तिचे हात-पाय दोरीने बांधले आणि तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. "अंकल वाचवा, अंकल सोडून द्या," अशी केविलवाणी विनंती ती मुलगी वारंवार करत होती. मात्र त्या व्यक्तीला तिची दया आली नाही.
VIDEO
This disturbing incident | पेरू चोरल्याच्या संशयावरुन चिमुकलीचा अमानुष छळ..| NDTV मराठी#Uttarpradesh #children #crimenews #ndtvmarathi pic.twitter.com/yFUEuzbMxN
— NDTV Marathi (@NDTVMarathi) April 6, 2026
(नक्की वाचा- Pimpri-Chinchwad: सावधान! वाकडमध्ये प्रवास करताना होऊ शकते फसवणूक; पाहा VIDEO, नेमकं काय होतंय?)
व्हिडिओ व्हायरल आणि पोलीस ॲक्शन
काही स्थानिकांनी हा प्रकार पाहून तातडीने मुलीची सुटका केली आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ जिल्हा प्रशासनाकडे आणि सोशल मीडियावर पोहोचताच एकच खळबळ उडाली. उना पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत तातडीने तपासचक्रे फिरवली आणि आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीविरुद्ध BNS (भारतीय न्याय संहिता) आणि JJ Act (जुवेनाईल जस्टिस ॲक्ट) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, विशेषतः अल्पवयीन मुलांसोबत असे वर्तन करणे हे मानवी संवेदनांच्या विरुद्ध आहे," असे जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
(नक्की वाचा- Iran-US War: बुधवारी पहाटे 5.30 वाजेनंतर काय घडणार? ट्रम्प यांच्या धमकीने जगाची चिंता वाढली)
माजी सैनिकाकडून अशा प्रकारच्या शिस्तीच्या नावाखाली क्रूरतेची अपेक्षा नव्हती, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. "एका पेरूसाठी मुलीचे मानसिक आरोग्य धोक्यात घालणे हे अत्यंत निंदनीय आहे," असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world