KDMC News: महापौरपदासाठी महायुतीत रस्सीखेच, मनसेचे 7 नगरसेवक नॉटरिचेबल; पडद्यामागे काय घडतंय?

KDMC News: महायुतीकडे 103 जागांचे संख्याबळ असले तरी, दोन्ही पक्षांनी महापौरपदावर दावा केला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) संख्याबळ जास्त असल्याने ते आपलाच महापौर व्हावा यासाठी आग्रही आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) निकालानंतर आता महापौरपदासाठी राजकीय खलबतांना वेग आला आहे. बहुमत मिळवूनही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात महापौरपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच, मनसे आणि इतर पक्षांचे नगरसेवक गायब झाल्याने चर्चांणा उधाण आलं आहे..

महापौरपदासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा असताना मनसेचे 7 नगरसेवक अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी (SP) गटाचे नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाल्याने महायुतीत नवा पेच निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला (भाजप 50, शिंदे सेना 53) स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, महापौर कोणाचा होणार? यावरून पेच निर्माण झाला आहे. अशातच मनसे आणि इतर लहान पक्षांचे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने पेच आणखी वाढला आहे.

(नक्की वाचा-  BMC Election : मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली; सर्वाधिक भाजपचे, गुजराती किती?)

मनसेची गुप्त रणनीती?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेचे 5 आणि ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही प्रत्यक्षात मनसेचे असलेल्या 2 अशा एकूण 7 नगरसेवकांना मनसे नेते राजू पाटील यांनी एका अज्ञात स्थळी ठेवले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी किंवा महापौरपदाच्या निवडणुकीत स्वतःचे वजन वाढवण्यासाठी मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक 'नॉट रिचेबल'

दुसरीकडे, महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडून आलेल्या दोनपैकी एक नगरसेविका सध्या संपर्काबाहेर आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) या गटाचा एकमेव नगरसेवकही 'नॉट रिचेबल' आहे. हे दोन्ही नगरसेवक सध्या शिवसेना (शिंदे गट) च्या संपर्कात असल्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)

केडीएमसी निवडणूक 2026 पक्षीय बलाबल (एकूण 122 जागा)

  • शिवसेना (एकनाथ शिंदे) - 53
  • भाजप - 50
  • |शिवसेना (UBT) - 11 
  • MNS- 5
  • काँग्रेस - 2
  • राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)- 1

महापौरपदाचा पेच

महायुतीकडे 103 जागांचे संख्याबळ असले तरी, दोन्ही पक्षांनी महापौरपदावर दावा केला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) संख्याबळ जास्त असल्याने ते आपलाच महापौर व्हावा यासाठी आग्रही आहेत. तर भाजपने आपल्या वाढलेल्या ताकदीचा हवाला दिला आहे. अशा परिस्थितीत मनसेची भूमिका आणि 'नॉट रिचेबल' नगरसेवकांचा पाठिंबा कोणाला मिळतो, यावर पुढील समीकरणे अवलंबून असतील.
 

Topics mentioned in this article