अमजद खान, प्रतिनिधी
KDMC Kelvan Video Viral : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इ प्रभागात केळवणाची पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी याबाबत व्हिडीओ सादर करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याआधी याच इ प्रभाग कार्यालयात कर्मचाऱ्यांचा पत्ते खेळतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत सत्यवान म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे. आता केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल या प्रकरणावर काय कारवाई करतात? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी वर्ग अनेक विचित्र कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आज बुधवारी ई प्रभागक्षेत्र कार्यालयात केळवण जेवणाचा जंगी समारंभ आयोजित करण्यात आला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. शासकीय कार्यालय हे जेवणावळीसाठी आहेत की लोकहितासाठी आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वच कर्मचारी एकाच वेळी जेवणाची सुट्टी कशी घेतात? यामुळे कामकाजावर परिणाम होतो. जर योग्य नियोजन असेल, तर नागरिकांना करदात्यांना ते सोयीचे ठरू शकतं, असंही लोकांचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> Delhi Blast: 'या' अभिनेत्रीने दिल्ली स्फोटात गमावली सर्वात जवळची मैत्रिण, म्हणाली, "मागच्या आठवड्यातच तिने.."
इथे पाहा केडीएमसी कार्यालयातील केळवणचा व्हिडीओ
पण येथील काही कर्मचाऱ्यांनी नियमांना धाब्यावर बसवून केळवणची पार्टी केली. त्यामुळे लोकांनी या कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं आहे. याआधीही कर्मचारी, अधिकारी वर्गाने दारू पार्टी, पत्ते खेळण्याचा धंद जोपासला होता. शासकीय कार्यालयात अशा प्रकारचे धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. सत्यवान म्हात्रे यांनी याप्रकरणी व्हिडीओ व्हायरल करून प्रशासनाला जाब विचारला होता. आता केडीएमसीचे आयुक्त याप्रकरणावर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नक्की वाचा >> बाईईई...काय हा प्रकार! 6 बायका एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट, व्हिडीओ पाहून लोक नवऱ्याला म्हणाले, रुको जरा रुको..