Delhi Bomb Blast Shocking Story: ‘पटेल की पंजाबी शादी', ‘प्रयाणम' आणि अशा इतर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री पायल घोषने शाळेतील मैत्रिणीला गमावलं आहे. 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात सुनीताचा मृत्यू झाला. हा स्फोट सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळील हुंडई i20 कारमध्ये झाला, ज्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेमुळे पायल अत्यंत दुःखी आहे आणि तिने सांगितले की, सुनीता तिच्याशी एका आठवड्यापूर्वीच बोलली होती.
अभिनेत्री पायल घोष नेमकं काय म्हणाली?
पायल घोष म्हणाली की, “मला अजूनही विश्वास बसत नाही की ती आता आपल्यात नाही. आम्ही फक्त एक आठवडा आधी बोलत होतो. ती नेहमी आनंदी असायची आणि सकारात्मकता पसरवायची. इतकी दयाळू आत्मा अशा प्रकारे निघून जाणं खरंच दुःखद आणि अविश्वसनीय आहे.” पायलने पुढे सांगितले, “ती फक्त माझी मैत्रीण नव्हती, ती कुटुंबासारखी होती. आम्ही एकत्र वाढलो, एकत्र भविष्याचे स्वप्न पाहिले, हसत-खेळत वेळ घालवला. तिला अशा प्रकारे गमावणं खूप वेदनादायक आहे.” पायल यांनी सर्वांना पीडितांच्या कुटुंबीयांसोबत एकजूट दाखवण्याचे आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
नक्की वाचा >> धर्मेंद्र की हेमा मालिनी, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? पैशांचा आकडा वाचून थक्कच व्हाल
गंभीर जखमी किंवा अपंग झालेल्या लोकांसाठी 5 लाखांची मदत
मंगळवार (11 नोव्हेंबर) रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्फोटात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांसाठी आणि गंभीर जखमी किंवा कायमस्वरूपी अपंग झालेल्या लोकांसाठी 5 लाखांची घोषणा केली. मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या, “या कठीण काळात दिल्ली सरकार त्या सर्व कुटुंबीयांप्रती आपली संवेदना व्यक्त करते ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे आणि जे जखमी झाले आहेत.”
नक्की वाचा >> 'तुझं करिअर संपवून टाकेल', अभिषेक-ऐश्वर्याच्या 'या' गाण्याबाबत 'बिग बीं'ची नाराजी, शंकर महादेवनला दिली धमकी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world