जाहिरात

बाईईई...काय हा प्रकार! 6 बायका एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट, व्हिडीओ पाहून लोक नवऱ्याला म्हणाले, रुको जरा रुको..

6 Pregnant Woman Viral Video :  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक गोष्टी इतक्या अनोख्या असतात की, त्यांच्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण असतं. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे.

बाईईई...काय हा प्रकार! 6 बायका एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट, व्हिडीओ पाहून लोक नवऱ्याला म्हणाले, रुको जरा रुको..
6 Pregnant Woman Viral Video
मुंबई:

6 Pregnant Woman Viral Video :  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक गोष्टी इतक्या अनोख्या असतात की, त्यांच्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण असतं. नुकतच आफ्रिकेच्या एका कुटुंबातील आश्चर्यकारक किस्सा व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओत एका व्यक्तीने दावा केला आहे की, त्याच्या 6 पत्नी आहेत आणि सर्व एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरीही चक्रावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आफ्रिका देशातील या व्यक्तीची तुलना केनियाच्या प्रसिद्ध 'बहुविवाह राजा' अकुकु डेंजरसोबतही केली जात आहे. हा व्यक्ती आता त्याच्या सर्व पत्नी एकाच वेळी गर्भवती झाल्याने खूप चर्चेत आला आहे. शेजारच्यांनी सांगितलं की, घरातील सर्व महिलांचं एकत्रित प्रेग्नंट होणं म्हणजे या व्यक्तीचं घर एखाद्या मॅटरनिटी वॉर्डपेक्षा कमी नाही.

नक्की वाचा >> धर्मेंद्र की हेमा मालिनी, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? पैशांचा आकडा वाचून थक्कच व्हाल

इथे पाहा 6 महिला गर्भवती झाल्याचा व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओला पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका व्यक्तीने मजेशीर अंदाजात म्हटलंय की, हा व्यक्ती नक्कीच लखपती असेल. तर काही लोक त्याला थांबण्याचा सल्लाही देत आहेत. तर दुसरीकडे काही लोक म्हणत आहेत, हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि महिलांच्या दयनीय स्थितीचं उदाहरण आहे. तर अन्य एका यूजरने म्हटलं, ही मजेशीर गोष्ट नाहीय. चिंताजनक बाब आहे. दुसऱ्या एकाने म्हटलं, इन्स्टाग्रामवरील सर्वात भयानक व्हिडीओ. त्या व्यक्तीचं वय बघा आणि त्या महिलांची अवस्था...

नक्की वाचा >> Delhi Blast: 'या' अभिनेत्रीने दिल्ली स्फोटात गमावली सर्वात जवळची मैत्रिण, म्हणाली, "मागच्या आठवड्यातच तिने.."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com