जाहिरात

Pune News: केतनच्या हत्येच्या काही दिवस आधीचा सिया-चेतनचा 'तो' रोमँटिक व्हिडिओ लीक, वाचा काय आहे सत्य?

Siya Goyal Chetan Choudhary romantic video: केतनची होणारी पत्नी सिया गोयल तसेच तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचा हत्या प्रकरणातील नवे अपडेट समोर आले आहे.

Pune News:  केतनच्या हत्येच्या काही दिवस आधीचा सिया-चेतनचा 'तो' रोमँटिक व्हिडिओ लीक, वाचा काय आहे सत्य?
Siya Goyal Chetan Choudhary : सिया गोयल आणि चेतन चौधरी हे सध्या पोलीस कोठडीत आहेत.
पुणे:

Siya Goyal Chetan Choudhary romantic video: पुणे येथील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत खळबळजनक आणि वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल तसेच तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचा हत्येच्या काही दिवस आधीचा एक अत्यंत वैयक्तिक आणि रोमँटिक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला होता. यामुळे संपूर्ण प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. हा व्हिडिओ काय आहे आणि त्याचे सत्य काय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

काय आहे रोमँटिक व्हिडिओचे सत्य

हा नवा व्हिडिओ केतनच्या हत्येच्या काही आठवडे आधीचा असून, 23 मे रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास एका कॅफेमध्ये शूट करण्यात आला आहे. स्नॅपचॅटवरील या व्हिडिओमध्ये सिया आणि चेतन अत्यंत आनंदी मूडमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सियाने चेतनचा हात धरून तो स्वतःच्या खांद्याभोवती घेत मिठी मारल्यासारखे हावभाव केल्याचे स्पष्ट दिसत आहे

या व्हिडिओची सत्यता आणि तांत्रिक बाजू पोलीस आता तपासून पाहत आहेत. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदाचा असून तो किती खरा असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत. तसंच हा व्हिडिओ AI नं तयार केला असा दावाही अनेक सुज्ञ नेटिझन्सनी  केला आहे. पण, याचे नेमके सत्य पोलिसांच्या तपासातच समोर येईल, 

( नक्की वाचा : Ketan Agarwal : केतनच्या हत्येनंतर सियाने काय लपवले? पोलिसांच्या हाती लागलेल्या नव्या धाग्यामुळे गूढ वाढले )

सियाच्या आईचा दावा काय?

दुसरीकडे, सियाच्या आई पूजा गोयल यांनी कालच माध्यमांशी बोलताना असा दावा केला होता की सिया आणि चेतन यांच्यात कोणतेही प्रेमसंबंध नव्हते, ते फक्त चांगले मित्र होते. साखरपुड्यानंतरच्या 4 महिन्यांत सियाने कधीही केतनला टाळले नाही किंवा तिच्या वागण्यात कोणताही बदल दिसला नाही, असे तिच्या आईने म्हटले होते. सोशल मीडियावर यापूर्वीच त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, त्यावर बोलताना ते एका मित्राच्या लग्नातील फोटो असल्याचे तिच्या आईने सांगितले होते. 

त्याचबरोबर माझी मुलगी जर दोषी असेल, तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तिला लवकरात लवकर फाशी द्या, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आता हा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर सियाच्या कुटुंबीयांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

( नक्की वाचा : Lohagad Fort: लोहगडावरील 'सिया पॉईंट'पाहण्यासाठी देशभरातून गर्दी; 2000 वर्षांच्या इतिहासाला अनपेक्षित वळण )

अपघाताचा बनाव आणि वडिलांचा संशय

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की, 18 जून रोजी सकाळी केतन घरातून निघाला होता. त्याने पुणे-मुंबई महामार्गावरील किवळे पुलावरून सियाला सोबत घेतले आणि ते दोघे लोहगड किल्ल्यावर गेले होते. त्यानंतर सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी सियाने केतनच्या आईला फोन करून केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडल्याचा बनाव रचला होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी केतनला दरीतून बाहेर काढून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर 21 जून रोजी केतनचे वडील विशाल देवइचंद अग्रवाल आणि त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

हा अपघात नसून घातपात असल्याचे त्यांच्या लक्षात आले, कारण ज्या जागेवरून केतन खाली पडला तिथून पाय घसरून पडणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करून सिया आणि चेतन चौधरी या दोघांना अटक केली. आता हा नवा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यामुळे सिया आणि चेतनने मिळूनच हा कट रचल्याचा संशय अधिक बळकट झाला आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com