Pune Lohagad Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, तिसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Ketan Agarwal Lohagad Fort Case: लोणावळ्यातील लोहगड किल्ला हत्याकांड प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने नीरज कुमार नावाच्या तिसऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पुणे

Ketan Agarwal Lohagad Fort Case: पुण्यातील केतन विशाल अग्रवाल याच्या हत्येचा छडा लावणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला तपासात आणखी एक मोठे यश आले आहे. या संपूर्ण हत्याकांडाला आता आणखी एक नवे वळण मिळाले असून, पोलिसांनी या प्रकरणात नीरज कुमार नावाच्या तिसऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघेही आधीच पोलिसांच्या कोठडीत असून, आता या तिसऱ्या व्यक्तीच्या एन्ट्रीमुळे कटाची व्याप्ती वाढली आहे.

नीरजचा मोबाईल वापरून रचला कट

गुन्ह्याचा तपास करत असलेल्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर चेतन चौधरी याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि आपले लोकेशन लपवण्यासाठी अत्यंत चलाखीने कट रचला होता. घटनेच्या दिवशी म्हणजेच 18 जून रोजी चेतन चौधरीने स्वतःचा अधिकृत मोबाईल फोन जाणीवपूर्वक स्वतःच्या घरीच ठेवून दिला होता, जेणेकरून त्याचे लोकेशन लोहगड किल्ल्यावर दिसणार नाही.

Advertisement

तो लोहगडला जाताना त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या नीरज कुमार या कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन गुपचूप स्वतःसोबत घेऊन गेला होता. धक्कादायक बाब म्हणजे, गडावर केतन अग्रवाल यांना 400 फूट दरीत ढकलून देण्यापूर्वी आणि नंतरही, चेतन संपूर्ण वेळ नीरजच्याच मोबाईलचा वापर करून सिया गोयलच्या सतत संपर्कात होता.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना धक्का! यावेळी बदली नाहीतर जबाबदारीच काढून घेतली)

नीरज कुमारची पडद्यामागची भूमिका काय? 

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कॉल रेकॉर्ड डेटा (CDR) तपासला असता, हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. हत्येच्या वेळी वापरण्यात आलेला हा मोबाईल फोन नीरज कुमारचा असल्याचे स्पष्ट होताच गुन्हे शाखेने त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

गुन्ह्यासाठी नीरजच्या मोबाईलचा वापर झाल्याचे भक्कम तांत्रिक पुरावे आमच्या हाती लागले आहेत. चेतनने नीरजला या संपूर्ण कटाची पूर्वकल्पना दिली होती का, नीरजचा या हत्येमध्ये पडद्यामागून काही सहभाग आहे का, की चेतनने केवळ त्याच्या अज्ञानाचा फायदा घेत फोन वापरला, याचा सखोल शोध लोणावळा ग्रामीण पोलीस घेत आहेत.

(नक्की वाचा-  Pune Lohagad Case: 'ती' एक गोष्ट ओळखली असती तर केतनचा जीव वाचला असता; काय म्हणाले वडील विशाल अग्रवाल?)

Advertisement

या नवीन खुलाशामुळे आरोपींनी हा खून किती पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने केला होता, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पोलीस आता नीरज कुमारची कसून चौकशी करत असून या प्रकरणात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Topics mentioned in this article