Pune Lohagad Case: 'ती' एक गोष्ट ओळखली असती तर केतनचा जीव वाचला असता; काय म्हणाले वडील विशाल अग्रवाल?

Pune Lohagad Case: केतनला सियाच्या वागण्याबद्दल आधीपासूनच शंका होती. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यापासून सिया बहुतांश वेळ फोनवर व्यस्त असायची आणि त्यावरून दोघांमध्ये अनेकदा किरकोळ वाद व्हायचे, असं केतनच्या वडिलांनी सांगितलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसे यात अनेक खुलासे समोर येत आहेत. सिया गोयल हिने केतनशी लग्न टाळण्यासाठी आणि त्याला संपवण्यासाठी यापूर्वीही अनेक प्रयत्न केले होते, हे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान, दोन्ही आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे.

केतनला आधीच संशय होता, वडिलांचा खुलासा

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना सांगितले की, केतनला सियाच्या वागण्याबद्दल आधीपासूनच शंका होती. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यापासून सिया बहुतांश वेळ फोनवर व्यस्त असायची आणि त्यावरून दोघांमध्ये अनेकदा किरकोळ वाद व्हायचे.

Advertisement

केतनने कुटुंबाकडे चेतन चौधरी याच्या नावाचा उल्लेखही केला होता आणि सियाच्या चारित्र्याबद्दल पडताळणी करण्याची विनंती केली होती. कौटुंबिक ओळखीचे हे स्थळ असल्याने मी केतनला काळजी न करण्याचा सल्ला दिला आणि त्याचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही," अशी खंत त्याच्या वडिलांनी व्यक्त केली.

(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना धक्का! यावेळी बदली नाहीतर जबाबदारीच काढून घेतली)

बाली ट्रिप रद्द करण्यासाठी लपवला पासपोर्ट

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीप सिंग गील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याच महिन्यात केतन आणि सिया यांची प्री-वेडिंग फोटोशूटसाठी 'बाली' येथे जाण्याची योजना होती. मात्र, मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर केतनचा पासपोर्ट गायब असल्याचे समजले आणि ट्रिप रद्द करावी लागली. तपासात समोर आले की, सियानेच तो पासपोर्ट मुद्दाम लपवला होता, जेणेकरून तिला केतनसोबत जावे लागणार नाही.

हत्येचा पहिला प्रयत्न

केतनच्या मृत्यूच्या अवघ्या 4 दिवसांपूर्वी सियाने त्याला लोहगड किल्ल्यावरच ट्रेकिंगसाठी आणले होते. तिथे तिने केतनला ढकलून दिले होते, पण नंतर "तिथे साप होता आणि मी तुला वाचवत होते," असा बहाणा करून तिने स्वतःचा बचाव केला होता.

(नक्की वाचा-  Omraje Nimbalkar: ओमराजे एकटे पडले, भावाने सोडली साथ? बंधू मकरंद राजेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट)

परदेशातून उच्चशिक्षण आणि नोव्हेंबरमध्ये शाही लग्न

केतन हा महाराष्ट्रातील अग्रगण्य वेअरहाउस डेव्हलपर कंपनी 'सक्सेस ग्रुप'चा संचालक होता. त्याने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील नामांकित 'बॅबसन कॉलेज'च्या एफडब्ल्यू ओलीन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. 2023 मध्ये तो पुण्यात परतला आणि कौटुंबिक व्यवसायात सक्रिय झाला. नोव्हेंबर महिन्यात उदयपूरमध्ये त्याचे लग्न होणार होते.

Advertisement